UPI Pin Change : Debit Card शिवाय UPI पिन कसा बदलायचा?

आता फोनवरूनच बदलता येईल महत्त्वाचा UPI PIN
UPI Pin Change
UPI Pin Change esakal

 UPI Pin Change : आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात, अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्यात. आज आपण घर बसल्या लांबच्या आपल्या नातेवाईकाला पैसे पोहोचवू शकतो. हे सगळ साध्य झालंय ऑनलाइन पेमेंटमुळे. आधी पैशांचा व्यवहार हा खरोखरच त्रासदायक होता.

ऑनलाइन पेमेंटचे युग सुरू झाल्यापासून मनी ट्रान्सफर, बिल पेमेंट, रिचार्ज या गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. UPI मुळे आपण घरबसल्या प्रत्येक गोष्ट करू लागलो.

 UPI हा देशातील सर्वाधिक पसंतीचा पेमेंट मोड आहे. कुठेही पैसे द्या, फक्त फोन काढा, QR कोड स्कॅन करा किंवा नंबर टाका, UPI पिन टाका आणि पेमेंट झाले. पेमेंट अॅपद्वारे कोणताही व्यवहार अधिकृत करण्यासाठी वापरकर्त्याने सेट केलेला UPI पिन आवश्यक आहे.

मोबाईल वापरकर्त्यांनी त्यांचे बँक खाते PhonePe, Paytm आणि Google Pay सह UPI अॅप्सशी लिंक करणे आवश्यक आहे आणि त्याच वेळी एक पिन सेट करणे आवश्यक आहे.

UPI Pin Change
Tech Tips : चुकीच्या UPI आयडीवर पेमेंट केले? पैसे परत मिळण्यासाठी हे काम लगेच करा

UPI म्हणजे काय?

UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, ही एक झटपट रीअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे जी खासकरून आंतर-बँक व्यवहारांसाठी NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेली आहे.

UPI ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI द्वारे नियंत्रित केली जाते. या कारणास्तव ते पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह मानले जाते. कोणत्याही प्लॅटफॉर्म UPI आयडीवरून केलेल्या व्यवहारांचे संपूर्ण खाते NPCI कडेच राहते. 

UPI Pin Change
Google Pay: 'गुगल पे' युजर्सला लागली लॉटरी! कंपनीनं पाठवले ८० हजारांचे रिवॉर्ड्स; वाचा काय घडलंय

UPI पिन खूप महत्त्वाचा आहे: जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या UPI पिनमध्ये छेडछाड केली गेली आहे. तर तुम्ही UPI अॅप्स वापरून Google Pay, BHIM आणि PhonePe चा वापर करून UPI ​​पिन रीसेट करू शकता. UPI पिन रीसेट करण्यासाठी, तुमच्याकडे डेबिट कार्ड देखील असणे आवश्यक आहे.

 जर तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल आणि तरीही तुमचा UPI पिन बदलायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सोपा मार्ग सांगत आहोत.

कसा बदलाल UPI PIN 

  • Paytm App उघडा

  • UPI & Payment Settings वर जा

  • UPI & Linked Bank Accounts मेन्यूवर क्लिक करा

  • बँक अकाऊंट सिलेक्ट करा आणि Change PIN वर क्लिक करा

  • त्यानंतर remember my old UPI PIN वर क्लिक करा

  •  या ऑप्शनवर जुना आणि नवा PIN नंबर टाका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com