Bryan Johnson : तरुण दिसण्यासाठी कोट्यवधी खर्च करतो हा उद्योगपती; आता केला मुलाच्या रक्ताचा वापर

४५ वर्षांचे जॉन्सन स्वतःला तरुण ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी डॉलर्स खर्च करतात.
Bryan Johnson
Bryan JohnsonEsakal

आपण कायम तरूण रहावं अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. अमेरिकेतील एक उद्योगपती मात्र, या गोष्टीसाठी स्वतःच्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. ४५ वर्षांच्या जॉन्सन यांना या वयात आपलं शरीर १८ वर्षांच्या व्यक्तीएवढं असावं अशी इच्छा आहे. स्वतःला तरुण ठेवण्यासाठी ते दरवर्षी कोट्यवधी डॉलर्स खर्च करतात.

आता याच गोष्टीसाठी ते प्लाझ्मा इन्फ्यूजनच्या (Plasma Infusion) नवीन प्रयोगाची चाचणी स्वतःवर करत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या १७ वर्षांच्या मुलाचे रक्त वापरले आहे. केवळ स्वतःवरच नाही, तर आपल्या ७० वर्षीय वडिलांवर देखील ते या प्रयोगाची चाचणी करत आहेत.

कोण आहेत ब्रायन?

ब्रायन जॉन्सन (Bryan Johnson) हे अमेरिकेतील एक अब्जाधीश उद्योजक आहेत. बायोटेक कंपनी कार्नेक्लो या कंपनीचे ते मालक आहेत. कंपनीच्या 'ब्लूप्रिंट' (Project Blueprint) या प्रोजेक्ट अंतर्गत आपलं वाढतं वय थांबवण्याचा, आणि एजिंग प्रक्रिया उलट करून पुन्हा तरुण होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यासाठी ते दरवर्षी सुमारे २ मिलियन डॉलर्स, म्हणजेच १६ कोटी रुपये खर्च करतात. आपल्या शरीराच्या देखरेखीसाठी त्यांनी ३० डॉक्टरांची टीम नेमली आहे.

मुलाच्या रक्ताचा वापर

तरुण होण्यासाठी आता ब्रायन यांनी आपला मुलगा टालमेज याच्या रक्ताचा वापर (Bryan Johnson uses son as blood boy) केला आहे. यावेळी टालमेजचे एक लिटर रक्त काढण्यात आले. या रक्तामधून पुढे प्लाझ्मा, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स वेगळे करण्यात आले. यामधील प्लाझ्मा हा जॉन्सन यांच्या रक्तात मिसळण्यात आला.

टालमेजच्या रक्तामधील काही प्लाझ्मा यावेळी ब्रायन यांच्या ७० वर्षीय वडिलांच्या रक्तामध्येही मिसळण्यात आला. अमेरिकेतील डल्लास शहराजवळ असलेल्या एका क्लिनिकमध्ये प्लाझ्मा इन्फ्यूजनचा हा प्रयोग पार पडला. याबाबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

ब्रायन हे कित्येक महिन्यांपासून वेळोवेळी प्लाझ्मा इंजेक्शन घेत आहेत. मात्र आतापर्यंत ते अनोळखी डोनर्सच्या प्लाझ्माचा वापर करत होते. यावेळी मात्र ब्रायन यांनी स्वतःच्या मुलाच्या प्लाझ्माचा वापर केला आहे.

Bryan Johnson
CarynAI : या तरुणीचा एआय क्लोन बनणार तुमची गर्लफ्रेंड; एका मिनिटासाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

प्लाझ्मा इन्फ्यूजनचा वापर शक्यतो लिव्हरचे आजार, भाजणे, किंवा रक्ताचे विकार असलेल्या रुग्णांवर केला जातो. या पद्धतीचा अँटी-एजिंगसाठी (Anti Ageing) उंदरांवर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला होता. मात्र, मानवांवर अशा प्रकारचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्लाझ्मा इंजेक्ट करण्याला कित्येक डॉक्टर चुकीचं ठरवतात. मात्र, जॉन्सन यांच्या मेडिकल टीमने या चाचणीला होकार दिला. आपण लवकरच या चाचणीचे परिणाम सर्वांसमोर मांडणार असल्याचं ब्रायन यांनी म्हटलं आहे.

Bryan Johnson
Elon Musk Robot Wives : इलॉन मस्ककडे आहेत रोबोट वाईव्हज्? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com