ऑनलाईन व्यवहार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही फसवणूक

online transaction
online transactionGoogle

कोरोना महामारीच्या कालावधीत देशात ऑनलाईन व्यवहार (online transaction) करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, यादरम्यान व्यवहारांसोबतच बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. ऑनलाईन व्यवहारांमध्ये सायबर गुन्हेगारही (Cyber Crime) मोठ्या प्रमाणावर लोकांना लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत, ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या ऑनलाईन व्यवहार करताना तुम्ही तुमच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या बँक खात्यात असलेली रक्कम सुरक्षित राहील आणि सायबर गुन्हेगार तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

सार्वजनिक वाय-फाय किंवा सायबर कॅफे टाळा

जर तुम्हाला तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवायचे असेल तर सार्वजनिक वाय-फाय आणि सायबर कॅफेमधील इंटरनेट वापरुन ऑनलाईन व्यवहार करु नका. असे केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. लक्षात ठेवा ऑनलाइन पेमेंट तुमच्या खाजगी वाय-फाय किंवा मोबाईल नेटवर्क वापरुनच केले पाहिजेत. cache मेमरी देखील क्लिअर करा. यामुळे तुमचे बँक खाते सुरक्षित राहील.

कोणत्याही वेबसाईटवर कार्ड डिटेल्स सेव्ह करू नका

अनेकदा असे होते की, लोक खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी त्यांच्या कार्डचे माहिती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सेव्ह करतात. असे करणे अत्यंत धोकादायक ठरु शकते. व्यवहार करताना तुम्हा तुमच्या कर्डच्या डिटेल्स सेव्ह केल्या नाहीत ना हे काळजीपुर्वक तपासा. जर तुम्ही कार्डची माहिती सेव्ह केली असेल तर ती त्वरित डिलीट करा. यामुळे तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही.

online transaction
होंडाची सर्वात स्वस्त कार Honda Amaze भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

वेबसाइटच्या URL कडे लक्ष द्या

ऑनलाइन पेमेंट करताना, वेबसाइटच्या URL वर लक्ष द्या. URL Http ऐवजी Https असावी. याठीकाणी देण्यात आलेला S अर्थ म्हणजे ही वेबसाइट सुरक्षित आहे. तुम्ही येथून पेमेंट करू शकता. जर URL मध्ये S दिसत नसेल, तर त्या वेबसाईटवरुन ऑनलाइन व्यवहार बिल्कूल करु नका.

मजबूत पासवर्ड वापरा

लॉगिन क्रेडेन्शियल्ससाठी मजबूत पासवर्ड तयार करणे एवढेच नव्हे तर बँकिंग, ई-कॉमर्स वेबसाइटवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड पिन बनवणे देखील महत्त्वाचे आहे. तसेच ते पासवर्ड्स वेळोवेळी बदलणे देखील महत्त्वाचे आहे. मजबूत पासवर्डमुळे तुमचे बँक खाते सुरक्षित राहील आणि तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही.

online transaction
वायरलेस हेडफोन्स तेही 600 रुपयांत, मिळेल बेस्ट साउंड क्वालिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com