User Information : लोकांचे फोटो चोरून 'X' वर चाललाय हा कारभार! युजर्सची माहिती आलीय धोक्यात

x वर 1140 आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI खाती आढळून आली
User Information
User Information esakal

User Information : इंडियाना युनिव्हर्सिटीच्या नव्या अभ्यासानुसार, x वर 1140 आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI खाती आढळून आली आहेत. एलोन मस्कच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वर, युजर्सच्या प्रायव्हसीबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

जसं की X वरील तुमची माहिती खरोखर सुरक्षित आहे का? जर तुमचं X (Twitter) वर अकाउंट असेल तर वेळेआधीच सावध व्हा, कारण अलीकडेच इंडियाना युनिव्हर्सिटीच्या नवीन अभ्यासात एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते.

User Information
Health Care News : महिलांना पुरुषांपेक्षा कमी असतो हार्ट अ‍ॅटॅकचा धोका; जाणून घ्या

इंडियाना युनिव्हर्सिटीच्या नव्या अभ्यासानुसार, x वर 1140 आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI खाती आढळून आली आहेत ज्यांना Fox8 botnet असं नाव देण्यात आलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की AI खाती असतील पण याचा आम्हाला काय तोटा? तर ही खाती युजर्सचे फोटो चोरतात आणि चॅटजीपीटीच्या मदतीने बनावट प्रोफाइल तयार करतात आणि बनावट सामग्री तयार करतात.

User Information
Sadhguru Health Tips : या पदार्थांसमोर नॉन व्हेजही फेल, प्रोटीन मिळवण्यासाठी खुद्द सद्गुरु खातात या 3 गोष्टी

न्यूयॉर्क पोस्टच्या मते, संशोधकांना आढळले की ही बॉट खाती लोकांना खोट्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास फसवण्याचे काम करतात. इतकेच नाही तर या बॉट्सने खऱ्या क्रिप्टो वॉलेटमधूनही चोरी केली असावी असा संशय संशोधकांना आहे.

User Information
Health Checkup : रेग्युलर हेल्थ चेकअप करणे का महत्वाचे आहे माहितीये? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

कसं समजेल या बनावट अकाउंट्स विषयी ?

जर तुम्हाला ही अकाउंट्स ट्रेस करायची असतील तर ही अकाउंट्स #bitcoin आणि #crypto सारखे हॅशटॅग वापरतात. हे अकाउंट्स क्रिप्टो बातम्यांवर आपलं जास्त लक्ष केंद्रित करतात आणि अशाच लोकांना निशाण्यावर घेतात.

User Information
Independence Day Special Health News : लोकलढ्यातून मिळाले आरोग्याला बूस्ट

फोटो चोरण्याचा खेळ का चालू आहे?

फोटो चोरण्याचा हा खेळ का सुरू आहे कारण हे बॉट अकाउंट्स तुमचे चोरलेले फोटो वापरून नवं अकाउंट तयार करतात आणि बॉट ऐवजी हे अकाउंट् एक व्यक्ती चालवत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.

User Information
Pregnancy Health Tips : गर्भधारणेदरम्यान डेंग्यूंची लागण ठरू शकते घातक; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय!

सध्या संशोधकांनी या अकाउंट्ची नावे उघड केलेली नाहीत, मात्र आता अशा बातम्या समोर आल्यानंतर एक्स (ट्विटर) युजर्सच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com