esakal | WhatsApp ची नवी पॉलिसी स्वीकारली नाही, तर 'या' सुविधांना मुकाल
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

WhatsApp ची नवी पॉलिसी स्वीकारली नाही, तर 'या' सुविधांना मुकाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp गेल्या काही काळापासून त्याच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे (new privacy terms) चर्चेत आहे. कंपनीने आणलेल्या नव्या पॉलिसीच्या अटींचा १५ मे पर्यंत स्वीकार केला नाही, तर WhatsApp ची सेवा बंद होईल असं म्हटलं जात होतं. मात्र, आता WhatsApp कडून एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार, अटींचा स्वीकार न करताही WhatsApp सुरू राहिल. मात्र, युजर्सला काही फिचर्स वापरता येणार नाहीत. (users who dont accept new privacy terms wont be able to access chat list or receive calls whatsapp)

WhatsApp युजर्सनी जर १५ मे पर्यंत नवीन पॉलिसी एक्सेप्ट केली नाही. तर, काही आठवड्यांपर्यंत त्यांना कंपनीकडून रिमाईंडर (Reminders) पाठवला जाईल. परंतु, त्यानंतरही जर युजर्सने त्याकडे दुर्लक्ष केलं. तर त्यानंतर मात्र, त्यांना काही फिचर्सचा वापर करता येणार नाही. नवीन पॉलिसी न स्वीकारल्यास त्यांना WhatsApp मधील लिमिडेट फिचर्सचाच वापर करावा लागले. परंतु, त्यांचं अकाऊंट बंद किंवा डिलीट होणार नाही.

हेही वाचा: पुरुषांनी अनुभवला मासिक पाळीतील त्रास; वेदनांमुळे झाली पळताभुई

पॉलिसी न स्वीकारल्यास 'या' फिचर्सला मुकाल

अट मान्य न केल्यास युजर्सला त्यांची चॅट लिस्ट अॅक्सेस करता येणार नाही. इतर युजर्सकडून हे चॅट रिसिव्ह होतील. या चॅटचं फक्त नोटिफिकेशन मिळेल. परंतु, ते संपूर्ण मेसेज ओपन करु शकणार नाहीत. तसंच नोटिफिकेशनद्वारेच त्यांना रिप्लाय द्यावा लागेल. तसंच तुम्हाला व्हिडीओ कॉल किंवा फोनदेखील उचला येणार नाही.

दरम्यान, यापूर्वी कंपनीने नव्या पॉलिसीची घोषणा केल्यावर अनेकांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. ही पॉलिसी न स्वीकारल्यास युजर्सचं अकाऊंट डिलीट होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

loading image
go to top