अंधारात मोबाईल वापरल्याने डोळ्याच्या पडद्याला पडली 500 छिद्र 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

तायवान - मोबाईलचा वाढता वापर आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला आता काही नवीन राहिलेले नाहीत. रात्री झोपायच्या आधी मेसेज बघणे किंवा जागून व्हिडिओ बघण्यासाठी अंधारात मोबाईलचा वापर करणे हे आपण सर्सास करतो. परंतु, असे वागणे एकीला चांगलेच महागात पडले आहे. मोबाईच्या ब्राईटनेसमुळे आणि सतत अशा प्रकारे मोबाईल बघितल्याने तिच्या डोळ्याच्या पडद्याला 500 छोटी छोटी छिद्र पडल्याचे समोर आले आहे. 'चेन' असे या मुलिचे नाव आहे. 

तिच्या ऑफिसच्या कामानुसार तिला रात्री देखील येणाऱ्या मेसेजेसला रिप्लाय करावा लागतो.. त्यावेळी ब्राईटनेस वाढवल्याने मेसेजेस पटकन वाटता येतात म्हणून तिने मोबाईलचा ब्राईटनेस वाढवला होता. त्याची सवय झाल्यावर हळू हळू याचे प्रमाण वाढत गेले आणि मोबाईलचा ब्राईटनेस संपूर्ण वाढवूनच तिने मोबाईलचा वापर सुरु केला. त्यानंतर रात्रीच्या वेळी याच ब्राईटनेसमध्ये ती व्हिडिओ बघत होती. गेले दोन वर्ष असे सतत केल्याने तिच्या डोळ्याच्या पडद्याला ही गंभीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

तिची दृष्टी तर खराब झालीच शिवाय तिच्या डोळ्यात सतत रक्त उतरणे, डोळे जळजळणे अशा प्रकारचे त्रास तिला सुरु झाले. याचा उपाय करायचे सोडून तिने फक्त चष्मा वापरणे किंवा डोळ्यात ड्रॉप्स घालणे, घरगुती औषधं घेणे असे थोडेफार उपाय केले. परंतु, चार महिन्यातच तिच्या डोळ्यांची परिस्थिती आणखी बिघडली. त्यानंतर तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला.

तिच्या डोळ्याची ही परिस्थिती पाहता डॉक्टरांनी उपाय सुरु केल्यावर तिन दिवसांनी औषधाला गुण यायला सुरुवात झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Using the mobile in the dark, cornea of the eye fell 500 cavities