टेक्नोहंट : ‘स्पॅम कॉल’ रोखण्यासाठी ‘एआय’ असिस्टंट

दिवसेंदिवस स्पॅम कॉल्स येण्याची संख्या वाढत आहे. युजर्सना विविध सेवा देणाऱ्या कंपन्यांपुढे स्पॅम कॉलचा पेच निर्माण झाला आहे.
Spam Call
Spam CallSakal
Updated on

- वैभव गाटे

दिवसेंदिवस स्पॅम कॉल्स येण्याची संख्या वाढत आहे. युजर्सना विविध सेवा देणाऱ्या कंपन्यांपुढे स्पॅम कॉलचा पेच निर्माण झाला आहे. त्यावर अनेक कंपन्या वेगवेगळे उपाय शोधत आहेत. मध्यंतरी व्हॉट्सअॅपने ‘सायलेंस अननोन कॉलर’ हे फिचर लॉन्च केले होते. त्यानंतर आता ‘ट्रूकॉलर’नेही ‘स्पॅम कॉल’ रोखण्यासाठी आणखी एक उपाय शोधला आहे.

यासाठी ट्रूकॉलरने थेट एआय असिस्टंटची मदत घेतली आहे. हा एआय असिस्टंट युजरच्या पर्सनल असिस्टंटसारखे काम करेल. ट्रूकॉलरने काही कालावधीसाठी हे फिचर युजर्सना निःशुल्क दिले आहे.

काय आहे ट्रूकॉलर एआय असिस्टंट?

अननोन कॉल ओळखण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रूकॉलरने आहे त्या फिचर्सवर मर्यादित न राहता युजर्सना एआय असिस्टंटचे फिचर देऊ केले आहे. यामुळे आता अननोन कॉल आला, तर तो युजरला उचलण्याची गरज नसून हा कॉल यूजरचा एआय असिस्टंट उचलेल. मशिन लर्निंग (एमएल) आणि क्लॉउड टेलिफोनीचा वापर करून हा असिस्टंट युजरला आलेला कॉल रिसिव्ह करावा की नाही याबद्दल मार्गदर्शन करेल.

कसे वापराल फिचर?

  • ट्रूकॉलर एआय असिस्टंट युजरला कॉल येत असल्याची सूचना देईल.

  • त्यानंतर युजर आपल्या एआय असिस्टंटला कॉल रिसिव्ह करण्यास सांगू शकतात.

  • हा एआय असिस्टंट कॉल केलेल्या व्यक्तीला त्याच्याबद्दल विचारणा करेल.

  • कॉल का केला आहे याबद्दलही असिस्टंट विचारणा करू शकतो.

  • त्यानंतर कॉल रिसिव्ह करायचा की नाही, की बंद करायचा अथवा ब्लॉक करायचा हा निर्णय युजरचा असेल.

  • या फिचरमध्ये युजर आपल्या असिस्टंटचा आवाज कस्टमाइज (स्त्री, पुरुष) करू शकतात.

  • याशिवाय युजर असिस्टंटचे फिचर ऑन-ऑफदेखील करू शकतात.

चौदा दिवस निःशुल्क

सध्या एआय असिस्टंटचे हे फिचर केवळ अॅण्ड्राइड युजर्ससाठी देण्यात आले आहे. तसेच हे फिचर सुरुवातीला ट्रायलसाठी १४ दिवस निःशुल्क असेल. त्यानंतर दरमहा त्याला १४९ रुपये शुल्क द्यावे लागेल. मात्र, सध्या ऑफरमध्ये हे फिचर ९९ रुपये प्रतिमहा उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय यात वार्षिक प्लॅन, कुटुंबासाठीचा प्लॅन व अन्य सशुल्क प्लॅन युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.