टेक्नोहंट : ‘अवतार’ची अफलातून दुनिया

व्हॉट्सअ‍ॅपवर ‘ईमोजी’ने व्यक्त होताय? आता विसरा! व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘अवतार’ची अफलातून दुनिया लॉन्च केली आहे.
Avatars Features
Avatars Featuressakal
Summary

व्हॉट्सअ‍ॅपवर ‘ईमोजी’ने व्यक्त होताय? आता विसरा! व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘अवतार’ची अफलातून दुनिया लॉन्च केली आहे.

- वैभव गाटे

व्हॉट्सअ‍ॅपवर ‘ईमोजी’ने व्यक्त होताय? आता विसरा! व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘अवतार’ची अफलातून दुनिया लॉन्च केली आहे. कंपनीने बहुप्रतीक्षित अ‍ॅनिमेडेट अवतार डीपी फीचर आणि अवतार स्टिकर्स नुकतेच आयओएस आणि अ‍ॅण्ड्राइडसाठी उपलब्ध केले आहेत. यात वापरकर्ते स्वतःची अ‍ॅनिमेडेट थ्रीडी प्रतिमा तयार करून, तब्बल ३६ स्टिकर्स बनवू शकतात. ज्याचा उपयोग मेसेजला रिप्लाय देण्यासाठी करता येईल. जाणून घेऊयात या मजेदार फीचरबद्दल...

काय आहे ‘अवतार’ फीचर?

वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवर आता हुबेहूब आपल्यासारखी अ‍ॅनिमेडेट प्रतिमा तयार करू शकतात. ही प्रतिमा वापरकर्त्यांना प्रोफाईल पिक्चर म्हणून वापरता येईल. चेहरेपट्टी, हेअरस्टाइल, आऊटफिट्स, अ‍ॅक्सेसरिज अशा हजारो कॉम्बिनेशनमधून वापरकर्ते आपला अवतार तयार करू शकतात व ते वापरकर्त्यांचे एक डिजिटल व्हर्जनच असेल. हे फिचर इन्स्टा आणि फेसबुक मेसेंजरला ‘मेटा’ने यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवर हे फिचर आल्यानंतर याचा वापर वाढणार आहे.

३६ विविध स्टिकर्स

व्हॉट्सअ‍ॅपने अवतारमध्ये ३६ कस्टम स्टिकर्सही दिले आहेत. वेगवेगळ्या मूडमध्ये हे स्टिकर्स आहेत. याद्वारे वापरकर्ते मेसेजद्वारे आपल्या भावना व्यक्त करू शकतात. अत्यंत मजेशीर असणाऱ्या या स्टिकर्समध्ये अफलातून अशा रिअ‍ॅक्शन देण्यात आल्या आहेत. ज्या हुबेहूब वापरकर्त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व्यक्त करतात. शिवाय हे स्टिकर्स वापरकर्ते एडिटही करू शकतात.

मेसेजवर सेंड करा अवतार

अवतारमुळे मेसेजवर चॅटिंग करणे अधिक मजेशीर आणि सोपे होणार आहे. आपला फोटो कोणालाही न पाठवता आपल्या चेहऱ्यावरील हावभाव या अवतार स्टिकर्सद्वारे वापरकर्ते शेअर करू शकतात. यातील काही स्टिकर्सही अत्यंत अतरंगी, उत्तम हावभाव असलेले असल्याने वापरकर्त्यांची चॅटिंगची मजाही दुप्पट होणार आहे. विशेष म्हणजे, मेसेज टाइप न करता वापरकर्ते स्टिकर्सच्या माध्यमातून आपल्या भावना समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतात. यामुळे वेळेचीही बचत होणार आहे.

असा तयार करा अवतार

  • सर्वप्रथम अ‍ॅप अपडेट करा.

  • सेटिंगमध्ये ‘अवतार’ या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर वापरकर्त्यांना आपला अवतार क्रिएट करता येईल.

  • अवतार तयार करण्यासाठी ‘मिरर’चा पर्यायही उपलब्ध.

  • अवतारमध्ये आपला लुक तयार करण्यासाठी बहुसंख्य पर्याय.

  • अवतार तयार झाल्यानंतर ‘डन’चा पर्याय निवडा.

  • यानंतर अवतार प्रोफाईल पिक्चर म्हणून वापरता येईल

अवतारचे स्टिकर्स

  • अवतार क्रिएट केल्यानंतर त्याचे स्टिकर्स तयार होतात.

  • अ‍ॅण्ड्राईडमध्ये हा पर्याय चॅटबॉक्समध्ये ईमोजीवर क्लिक केल्यावर ‘जीआयएफ’च्या शेजारी उपलब्ध.

  • आयफोनमध्ये हा पर्याय चॅटबॉक्सवर उपलब्ध.

  • हे स्टिकर्स मेसेजवर सेंड करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com