Valentine Day Google Doodle : गूगलही साजरा करतंय व्हॅलेंटाइन डे, डूडलवर पडतोय प्रेमाचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Day Google Doodle

Valentine Day Google Doodle : गूगलही साजरा करतंय व्हॅलेंटाइन डे, डूडलवर पडतोय प्रेमाचा पाऊस

Valentine Day Google Doodle : जगभरातील लोक आज, 14 फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस साजरा करत आहेत. अगदी Google देखील त्यांच्या वार्षिक Google डूडलने व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे. व्हॅलेंटाईन डे च्या प्रेमात असल्याच्या भावनेचे प्रदर्शन Googleने डूडद्वारे केले आहे . हे पावसाचे थेंब एकत्र जोडून हृदय तयार करण्याचे एक मनमोहक अॅनिमेशन डू़डलने तयार केले आहे. दोन प्रेमी एकत्र येतात अगदी त्याप्रमाणेच दोन पावसाचे थेंब एकत्रित येत लव्ह हार्ट क्रिएट करताना डूडलने दर्शवले आहे.

गुगल डूडलच्या ऑफिशीयल पेजने 14 फेब्रुवारी, मंगळवार रोजी "पाऊस असो वा गडगडाट, तू माझी होशील का" (Rains or Shine, will you be mine) असे विधान प्रसिद्ध केले. आज डूडल वर्षातील सर्वात रोमँटिक डे सेलिब्रेट करत आहे. ज्यादिवशी सगळी प्रेम जोडपी एकत्र येईल त्यांच्या प्रेम भावना व्यक्त करतात.

गुगल डूडल पेजने व्हॅलेंटाईन डेशी संबंधित विविध दंतकथांही सांगितल्या आहे. "तुम्हाला माहीत आहे का की मध्ययुगात, इंग्लंड आणि फ्रान्स सारख्या युरोपीय देशांचा असा विश्वास होता की 14 फेब्रुवारी या दिवशी पक्ष्यांच्या मॅटिंग सीजनला सुरुवात होते? त्यांनी याचा प्रेमाशी संबंध जोडला आणि नंतर लगेचच रोमँटिक उत्सव सुरू केले. तसेच तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत हा व्हॅलेंटाइन डे साजरा करत असणार अशी अपेक्षाही गूगलने व्यक्त केली व सगळ्यांना व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा दिल्यात.

व्हॅलेंटाईन डे हा दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी येतो. आधुनिक काळात, हा एक व्यावसायिक सण बनला आहे. जेथे प्रेमी त्यांच्या पाटनर्सना सरप्राइज गिफ्ट, फूल आणि चॉकलेट देत आपुलकी व्यक्त करतात. जोडपे विशेषत: एकमेकांना त्यांचे प्रेम आणि वचनबद्धता दाखवण्यासाठी बाहेर पडतात. गिफ्ट्सचा वर्षाव करण्यापासून ते कँडललाइट डिनर आणि रोमँटिक गेटवेपर्यंत, ते त्यांच्या खास व्यक्तीबद्दल प्रेम व कौतुक करण्याची संधी प्रेम युगूल या दिवशी अजिबात सोडत नाहीत.