Vande Bharat : 'वंदे भारत' आता अधिक सुरक्षित! आलं नवीन सेफ्टी फीचर; रेल्वेच्या ४५० एसी कोचमध्ये यंत्रणा कार्यान्वित

आग आणि धूर शोधणारी ही यंत्रणा एसी कोचमध्ये उपयोगी ठरणार आहे. एसी डब्यांमध्ये ८ ते ११ स्मोक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
Vande Bharat Safety Feature
Vande Bharat Safety FeatureeSakal

Vande Bharat Smoke Detector Alarm : रेल्वेत आगीच्या घटना रोखण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने ४५० एसी कोचमध्ये आता आग आणि धूर शोधण्याची (फायर अँड स्मोक डिटेक्शन सिस्टीम) प्रगत यंत्रणा बसविली आहे. यात बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे.

ही प्रणाली धूर शोधून प्रवाशांना अलार्म, लाइट इंडिकेटर आणि ऑडिओ साउंडसह सावध करते. फायर आणि स्मोक डिटेक्शन सिस्टीम छत्तीसगड एक्स्प्रेससह संपर्क क्रांती एक्स्प्रेस, शिवनाथ एक्स्प्रेस, बिलासपूर-पाटणा एक्स्प्रेस, बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस तसेच जनशताब्दीसह दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या २८ जोडी रेल्वेगाड्यांच्या एसी डब्यात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

यामध्ये बिलासपूर विभागातील १४, रायपूर विभागात १३ आणि नागपूर विभागातील एका रेल्वेचा समावेश आहे. पॉवर कार आणि पँट्री कारमध्ये सुद्धा ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक डब्यात सरासरी ८ ते ११ स्मोक डिटेक्टर लावलेले आहेत.

Vande Bharat Safety Feature
Samsung Galaxy S24 Made in India : भारतात तयार होणार सॅमसंगची S24 सीरीज; सर्व फोनवर लिहिलेलं दिसणार 'मेड इन इंडिया'

ऑडिओ व्हिज्युअल अलार्म

आग आणि धूर शोधणारी ही यंत्रणा एसी कोचमध्ये उपयोगी ठरणार आहे. एसी डब्यांमध्ये ८ ते ११ स्मोक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने धुराचा शोध लूपमध्ये कंट्रोल मॉड्यूलशी जोडलेला आहे. आग लागल्यास हे कंट्रोल मॉड्यूल ऑडिओ व्हिज्युअल ध्वनी अलार्मचे संकेत देईल. तसेच लाइट इंडिकेटर, प्रीलोडेड घोषणेसाठी लावण्यात आले आहे.

सेन्सर कार्यान्वित होणार

धूर शोधणारी ही यंत्रणा ट्रेनमध्ये आग लागण्यापूर्वीच अलार्म वाजवेल. त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता येणार आहे. आगीची ठिणगी किंवा आगीची घटना लक्षात येताच सेन्सर कार्यान्वित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com