esakal | मे महिन्यात कार विक्रीला मोठा ब्रेक!
sakal

बोलून बातमी शोधा

Luxurious-Cars

मे महिन्यात कार विक्रीला मोठा ब्रेक!

sakal_logo
By
विनोद राऊत - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मे महिना वाहन विक्रीच्या दृष्टीने सर्वाधिक निराशाजनक ठरला. या महिन्यात देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. गेल्या 12 महिन्यातील कार विक्रीची सर्वात निच्चांकी नोंद या महिन्यात करण्यात आली आहे. देशभरात लागलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांनी कारनिर्मितीही काही काळासाठी थांबवली होती. जून महिन्यातही कार विक्री एकदम पिकअप घेईल अशी परिस्थिती नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (vehicle-sales-break-in-may)

देशातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने मे महिन्यात 32,908 कार विक्री केल्या. गेल्या वर्षभरातील कार विक्रीचा हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी मे 2020 मध्ये कंपनीने 13 हजार 865 कार विक्री केल्या होत्या. देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी हुंदाई मोटरने या महिन्यात केवळ 25 हजार 001 कार विक्रीची नोंद केली आहे. 11 महिन्यातील ही सर्वात वाईट कामगिरी आहे. यापूर्वी, जून 2020 मध्ये कंपनीने 21 हजार 320 कार विक्री करण्याची नोंद केली होती. टाटा मोटर्सनेही मे महिन्यात कार विक्रीत मार खाल्ला आहे. कंपनी या महिन्यात केवळ 15 हजार 181 कार विकू शकली, गेल्या महिन्यात कंपनीच्या 25 हजार कार खपल्या होत्या. मे 2020 मध्ये कंपनीने 3 हजार 152 कार विक्रीचा निच्चांक गाठला होता.

Luxurious-Cars

Luxurious-Cars

हेही वाचा: भन्नाट आजोबा; बॉडीलोशनप्रमाणे करतात सॅनिटायझरचा वापर

महिंद्रा अॅण्ड महिंद्राने या महिन्यात कसेबसे 8 हजार 004 कार विक्रीचे लक्ष गाठले आहे. कंपनीसाठीही या वर्षातील ही निराशाजनक कामगिरी ठरली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात 2 हजार 867 कार विक्री केल्या होत्या.

जून महिन्यात उठाव नाही

गेल्या महिन्यात अनेक कंपन्यानी फॅक्टरी मेंटेनेंससाठीही उत्पादन बंद केले होते. या काळात उत्तर भारतात वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी ही कृती महत्वाची होती. आता दुसरी लाट थंडावली आहे. मात्र जून महिन्यात कार खरेदीला एकदम वेग येईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कार उत्पादनाची क्षमता कमी ठेवली आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढल्यावर, परिस्थिती सामान्य होईल त्यानंतरच वाहन क्षेत्राला उभारी मिळेल अस या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

संपादन : शर्वरी जोशी