Second Hand Phone : तुम्ही घेतलेला सेकंड हॅन्ड फोन चोरीचा तर नाहीय ना?

तो फोन चोरीचा आहे हे कसं ओळखायचं?
Second Hand Phone
Second Hand Phone esakal

Verify Second Hand Phone : नवे कोरे फोन अगदी रास्त भावात मिळत असतानाही लोकांची जूने फोन घेण्यासाठी गर्दी असते. का तर जूने कमी वापरलेले फोन घेतले की रूबाब करता येतो. एका Branded कंपनीच्या Phone बाबतीत हा प्रकार सर्रास घडतो. करण त्या Phone Price लाख रूपयाच्या घरात आहे.

असं असताना आपण तो फोन घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं. पण तो फोन चोरीचा आहे हे नंतर लक्षात येतं. जर तुम्ही Online किंवा ऑफलाइन स्टोअरमधून सेकंड हँड फोन खरेदी करत असाल तर तुम्हाला सावध गिरी बाळगण्याची गरज आहे.

Second Hand Phone
Hardik Pandya Second Wedding : ना सात फेरे.. ना मंगलाष्टकं.. पांड्याने कसं केलं दुसरं लग्न?

सेकंड हँड Gadgets विकणाऱ्या अनेक साइट्सवर चोरीचे फोनही विकले जात आहेत. फोन चोरीला गेला आहे की नाही, हे शोधणे आता खूप सोपे झाले आहे. नुकतेच दूरसंचार मंत्रालयाने साथी पोर्टल लाँच केले आहे जेणेकरून आपण सेकंड हँड फोनची संपूर्ण माहिती पडताळून पाहू शकाल. तसेच या पोर्टलवर हरवलेला फोन ब्लॉक आणि ट्रॅक करण्याची सुविधा आहे.

कम्युनिकेशन साथीमध्ये “Know Your Mobile” हे फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे युजर्स खरेदी करण्यापूर्वी Second Hand Phone ची सत्यता पडताळून पाहू शकतात. यामुळे सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रवृत्तीत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.

Second Hand Phone
Mohsin Khan hand Injury : त्यावेळी माझा हात कापावा लागला असता... मोहसिन खानने सांगितला तो भयानक प्रसंग

सेकंड हँड फोनची पडताळणी कशी करावी?

तुम्ही पोर्टलवर सेकंड हँड फोनचा आयएमईआय नंबर व्हेरिफाय करू शकता.

यासाठी तुम्ही खरेदी करणार असलेल्या फोनमध्ये *#06# डायल करा.

हे डायल करताच स्क्रीनवर त्या फोनचा आयएमईआय नंबर दिसेल.

हा आयएमईआय नंबर कुठेतरी सेव्ह करा.

यानंतर तुम्हाला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या (https://www.ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp) वेबसाइटवर जावे लागेल.

येथे तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आयएमईआय नंबर टाकण्याचा पर्याय दिसेल.

इथे आयएमईआय नंबर टाकताच त्याची स्टेटस दिसेल

- जर तो ब्लॅकलिस्टेड, डुप्लिकेट किंवा आधीच वापरात असेल तर समजून घ्या की फोन चोरीला गेला आहे.

Second Hand Phone
Second-Hand Car : सेकंड हँड कार घेताय की, क्रिमिनल्सला पडताय बळी? आधी या गोष्टींची करा खात्री

फोन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जुना फोन आपल्याला खूप कमी किंमतीत मिळत असतो. अशावेळी आपण फोन न तपासताच खरेदी करतो. मात्र, फोन न तपासता खरेदी केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

तुम्ही जर जुना फोन खरेदी करायला जात असल्यास विक्री करणाऱ्याची नक्की भेट घ्या. अनेकदा फोन विकताना सांगितलेल्या गोष्टी खोट्या असण्याची शक्यता असते.

जुन्या फोन्सचे पार्ट्स नक्की पाहा. स्क्रीन, फोनच्या बॉडीवर कोणतेही स्क्रॅच तर नाही हे पाहा

सेकंड हँड फोन खरेदी करताना फोनचे इनवॉइस बिल आणि रिटेल बॉक्स घ्यायला विसरू नका. बिल दिल्यास त्यावरील IMEI Number आणि फोनचा IMEI नंबर नक्की पाहा.

स्मार्टफोनच्या बॉडीवर कोणत्या खुणा आहेत किंवा त्याची स्क्रीन चांगली आहे की नाही हे तर तुम्ही तपासण्याची तसदी घ्यालच. पण, त्या शिवाय जुना स्मार्टफोन खरेदी करताना जात असाल तर लॅपटॉप आणि यूएसबी केबल अवश्य बरोबर न्या. स्मार्टफोन लॅपटॉपशी जोडून तो व्यवस्थित चार्ज होतो किंवा नाही, याची पाहणी करा.

ऑनलाइन पद्धतीने सेकंडहँड फोन खरेदी करीत असाल, तर कोणत्याही सुरक्षित App वरूनच रक्कम संबंधिताला हस्तांतरीत करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com