

Vi Launches 6 New Affordable Recharge Plans with Up to 365 Days Validity
esakal
Vi New Recharge Plans 2026: खासगी क्षेत्रातील प्रमुख टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आइडियाने (Vi) भारतीय बाजारात ग्राहकांसाठी अगदी खिशाला परवडणारे नवीन रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटर 'ट्राय' (TRAI) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत, एअरटेलनंतर आता Vi ने देखील फक्त कॉलिंगची सुविधा देणारे (Voice-Only Plans) नवीन प्लान सादर केले आहेत.
अनेक मोबाइल वापरकर्त्यांना इंटरनेट डेटाची गरज नसते, अशा ग्राहकांसाठी हे प्लान अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. Vi ने एकूण ६ नवीन रिचार्ज प्लान लाँच केले असून, याची सुरुवातीची किंमत फक्त १७९ रुपयांपासून सुरू होते आणि यामध्ये वर्षभराची (३६५ दिवस) वैधता देणारा प्लान देखील समाविष्ट आहे. वोडाफोन-आइडियाच्या या नवीन रिचार्ज प्लान्सची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-