esakal | Vi चा स्वस्तातला प्लॅन, दररोज 1 जीबी डेटासह मिळेल फ्री कॉलिंग

बोलून बातमी शोधा

vi
Vi चा स्वस्तातला प्लॅन, दररोज 1 जीबी डेटासह मिळेल फ्री कॉलिंग
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Vodafone-Idea (Vi) ची 109 रुपयांचा रिचार्ज प्लॅन पुन्हा भारतीय बाजारात परत आला आहे. हा Vi अफोर्डेबल प्री-पेड रिचार्ज प्लॅन आहे, जो 109 रुपयांत देण्यात येतो येते. Vi चा हा प्लॅन व्होडाफोन आणि आयडियाच्या मर्जरच्या वेळी सुरू करण्यात आला होता, जो कंपनीने बंद केला होता. मात्र जोरदार मागणीमुळे आता हा प्री-पेड प्लॅन टेलिकॉम कंपनी VI ने सादर केला आहे. हा प्लॅन देशभर उपलब्ध असेल. आज आपण या प्लॅन विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Vi चा 109 रुपये प्री-पेड प्लॅन

व्होडाफोन-आयडिया (VI) चा 109 रुपये प्री-पेड प्लॅन 20 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा देण्यात आला आहे. म्हणजे Vi च्या वापरकर्त्यांना 20 दिवसांत एकूण 20GB हाय स्पीड डेटा मिळेल. या योजनेत वापरकर्त्यांना 300 स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. हे कॉल करण्यासाठी सर्व नेटवर्कवर अमर्यादित फ्री स्थानिक आणि एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग देण्यात आले आहे.

149 रुपयांचा Vi प्री-पेड प्लॅन

बाजारात Vi च्या 109 रुपयांच्या प्री-प्लॅन प्रमाणे इतर अनेक स्वस्त रिचार्ज योजना उपलब्ध आहेत. या पैकी एक Vi ची 149 रुपये किमतीचा प्री-पेड प्लॅनआहे . ही योजना 28 दिवसांच्या वैधतेसह येते. या योजनेत दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय मोफत कॉलिंग व 300 एसएमएससुद्धा दिले जातात. तसेच Vi अ‍ॅपवर 1 जीबीचा अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, Vi movies आणि TV चे सब्सक्रिप्शन देण्यात येते. Vi च्या वतीने प्री-पेड प्लॅन 16 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत देण्यात येतो. ज्यामध्ये 1 जीबी डेटा 24 तासांसाठी देण्यात येतो. त्याशिवाय 28 दिवसांच्या वैधतेसह 48 रुपयांच्या प्री-पेड योजनेवर 3 जीबी आणि 12 जीबी डेटा देण्यात येतो.