esakal | आता Netflix च्या ग्राहकांना 'Video games' चाही आनंद घेता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

netflix

आता Netflix च्या ग्राहकांना 'Video games' चाही आनंद घेता येणार

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: कोरोनाकाळात जगभरातील बऱ्याच लोकांनी मनोरंजनासाठी त्यांचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. मागील दोन वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दर्शकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. नेटफ्लिक्सने (Netflix) आता त्यांच्या दर्शकांना एक खूशखबर दिली आहे. पुढील काही दिवसांत नेटफ्लिक्सवर आता व्हिडीओ गेमही (video games) खेळता येणार आहे. याबद्दलची पुष्टी नेटफ्लिक्सने दिली आहे.

वाढलेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांना कंपनीशी जोडून ठेवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ गेमची ऑफर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध असणार आहे. पण सुरुवातीला कंपनी मोबाईल गेम्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही सांगितले आहे.

हेही वाचा: रॉयल्टी, डिझेल, लोखंड दरवाढीने स्टोन, क्रशर उद्योग अडचणीत

आता नेटफ्लिक्सवर ग्राहकांना चित्रपट आणि इतर कंटेंटसह व्हिडीओ गेमही उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने भागधारकांना दिलेल्या पत्रात दिली आहे. याबद्दलची बातमी रॉयटर्सने दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेमिंगद्वारे अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची माईक व्हर्ड (Mike Verdu) यांची गेम डेव्हलपमेंटच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. याचसंबंधी भविष्यात नेटफ्लिक्स आणखी मनुष्यबळ वाढवेल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

नेटफ्लिक्सच्या टीव्ही उत्पादनावर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. तर दुसऱ्या बाजून नेटफ्लिक्सचे स्पर्धक असणारे Disney+ and HBO Max यांचे ग्राहक वाढत आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे नेटफ्लिक्सने व्हिडीओ गेमच्या समावेशाबद्दल माहिती दिली आहे. यामुळे आता भविष्यात नेटफ्लिक्सच्या ग्राहकांना व्हिडीओ गेमचा आनंद घेता येणार आहे.

loading image