
भारतासाठी आनंदाची बातमी आहे
आपण सेमिकॉन इंडिया 2025 हे स्वदेशी तंत्रज्ञान आणले आहे
चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती
भारताने सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय रचला. इस्रोच्या सेमिकॉन्डक्टर प्रयोगशाळेने (एससीएल) विकसित केलेली भारताची पहिली स्वदेशी 32 बिट प्रोसेसर चिप ‘विक्रम-32’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादर केली. ही चिप भारताच्या सेमिकॉन्डक्टर स्वावलंबनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.