64MP कॅमेरासह Vivo Nex 3 लाँच

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

Vivo Nex 3 आणि Vivo Nex 3 5G हे दोन स्मार्टफोन कंपनीने आज लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने 64MP चा कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Nex 3 आणि Vivo Nex 3 5G हे दोन स्मार्टफोन कंपनीने आज लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. आता हे फोन्स भारतात 29 नोव्हेंबरपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

Vivo चे हे दोन स्मार्टफोन कधी लाँच होणार यासाठी ग्राहक प्रतिक्षेत होते. मात्र, आता हे फोन्स चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. Vivo Nex 3 हा स्मार्टफोन 50 हजार रुपयांपासून उपलब्ध असणार आहे. 44W फास्ट चार्जिंगची सुविधा या फोनमध्ये देण्यात आली आहे. हे स्मार्टफोन आज लाँच झाले असले तरीदेखील 21 सप्टेंबरनंतर चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

असे आहेत या फोन्सचे फिचर्स

- डिस्प्ले :  6.89" (17.5 cm) वॉटरफॉल फुल व्ह्यू 

- कॅमेरा :  64MP + 13MP + 13MP. पॉप-अप सेल्फी कॅमेरा

- प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन 855+ 

- स्टोरेज : 256 GB

- बॅटरी : 4,500 mAh 

- किंमत : 50 हजार रुपये आणि त्यापासून पुढे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivo Nex 3 and Vivo Nex 3 5G launch in China