Vivo V21 चा नवीन कलर व्हेरियंट भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

हा स्मार्टफोन आर्कटिक व्हाइट, डस्ट ब्लू, सनसेट डॅझल या तीन रंगात उपलब्ध होता.
Vivo V21
Vivo V21Sakal
Updated on

मुंबई : Vivo कंपनीने त्यांच्या Vivo V21 या नव्याकोऱ्या स्मार्टफोनचा नियॉन स्पार्क (neon spark edition) व्हेरियंट भारतात लॉंच केला आहे. तत्पूर्वी हा स्मार्टफोन आर्कटिक व्हाइट, डस्ट ब्लू, सनसेट डॅझल या तीन रंगात उपलब्ध होता.

नियॉन स्पार्क या नव्या कलर व्हेरियंटमध्ये हा स्मार्टफोन अत्यंत आकर्षक दिसत असून डिझाईनही उत्तम आहे. दरम्यान या स्मार्टफोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात, 64 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप, 4K सेल्फी व्हिडिओसाठी 44 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, मीडियाटेक डायमेन्सिटी 800U प्रोसेसर आणि 4000 एमएएचची बॅटरी आणि 33 वॉटचे सुपरफास्ट चार्जर ​आदी महत्त्वाचे फीचर्स या दिले आहेत.

​Vivo V21 स्मार्टफोन मॅट ग्लास फिनिशिंग देण्यात आले असून तो दोन मेमेरी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध झाला आहे. सोबतच 3 जीबीची एक्सटेंडेड रॅमदेखील दिली आहे. Vivo V21 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरियंटची किंमत 29,990 रुपये, तर 8 जीबी आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 32,990 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2500 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हा स्मार्टफोन विवो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन वरून खरेदी करता येणार आहे.

Vivo V21
आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

Vivo V21 चे फीचर्स -

डिस्प्ले : 6.44" FHD+ AMOLED Screen

प्रोसेसर : MediaTek Dimensity 800 U

रॅम : 8 GB (3 GB Expandable)

स्टोरेज : 128 GB & 256 GB

कॅमेरा : 64 MP (प्रायमरी कॅमेरा) + 8 MP (वाईड अँगल कॅमेरा) + 2 MP (मॅक्रो कॅमेरा)

फ्रंट कॅमेरा : 44 MP

बॅटरी : 4000 mAh

चार्जिंग : 33 वॉट

ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11

किंमत :

8 GB + 128 GB : 29,990 रुपये

8 GB + 256 GB : 32,990 रुपये

Vivo V21
टीनएजर्ससाठी इलेक्ट्रिक स्कूटर; driving license ची गरज नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com