विवोच्या रंग बदलणाऱ्या फोनवर मिळतेय बंपर सूट; स्वस्तात खरेदी करा Vivo Y75 अन् Vivo Y35

vivo v25 series vivo y75 series vivo y35 cashback offers in new year Christmas year end sale
vivo v25 series vivo y75 series vivo y35 cashback offers in new year Christmas year end sale

Vivo Smartphone Sale: वर्ष संपण्यापूर्वी, Vivo ने भारतात आपल्या स्मार्टफोन्सवर ऑफर जाहीर केल्या आहेत. नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या मुहूर्तावर विवोने आपला मिड-बजेट रेंज स्मार्टफोन सेलमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ग्राहक 19 डिसेंबरपासून हे Vivo स्मार्टफोन कॅशबॅक आणि बँक ऑफरसह खरेदी करू शकतात. हा सेल 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. Vivo V25 Series, Vivo Y75 आणि Vivo Y35 स्मार्टफोन्स सेलमध्ये डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहेत.

या सेलमध्ये कॅशबॅक, डिस्काऊंट आणि बँक कार्ड ऑफरसह किमतींवर Vivo V25 सीरीज, Vivo Y75 आणि Vivo Y35 वर मोठी सूट मिळवण्याची संधी मिळते. चला तर मग सर्व ऑफर्स जाणून घेऊया...

Vivo V25 सीरीज ऑफर

Vivo V25 Series ही कंपनीची लेटेस्ट मिड-रेंज सीरीज आहे ज्यामध्ये स्मार्टफोन 27,999 रुपयांच्या किमतीत घरेदी करता येऊ शकतो. Vivo V25 Pro हा या सीरीजमधील सर्वात प्रीमियम फोन आहे आणि तो भारतात 35,999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Vivo V25 Pro हँडसेटच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सध्या 39,999 रुपये आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरमध्ये दोन्ही व्हेरिएंटवर रु. 2,500 पर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे . ही कॅशबॅक ऑफर ICICI, SBI आणि इतर मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. कॅशबॅक ऑफर ईएमआय आणि नॉन-ईएमआय दोन्ही व्यवहारांवर मिळू शकते.

हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

vivo v25 series vivo y75 series vivo y35 cashback offers in new year Christmas year end sale
Lionel Messi : मेस्सीचा जन्म आसाममध्ये, कॉंग्रेस खासदारानं तोडले अकलेचे तारे

Vivo V25 5G बद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांची कॅशबॅक ऑफर आहे. ICICI बँक, SBI आणि इतर बँक कार्डद्वारे Vivo V25 5G खरेदी केल्यावर ग्राहकांना रु. 2000 चा कॅशबॅक मिळू शकतो. कॅशबॅक ऑफरनंतर, हँडसेटची किंमत 25,999 रुपयांपर्यंत खाली येईल.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर Vivo V25 आणि Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कलर चेंजिंग बॅक पॅनलसह येतात. V25 Pro मध्ये MediaTek Dimensity 1300 तर Dimensity 900 प्रोसेसर स्टँडर्ड मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

vivo v25 series vivo y75 series vivo y35 cashback offers in new year Christmas year end sale
FIFA World Cup 2022 : देशात बिकीनीवरून ट्रोल होणाऱ्या दीपिकाने कतारमध्ये केले वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

Vivo Y75 सीरीज , Vivo Y35 ऑफर

Vivo Y75 4G भारतात 2022 मध्ये लॉन्च झाला आहे. आणि हा फोन रु. 20,999 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा हँडसेट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. आणि आयसीआयसीआय क्रेडिट आणि डेबिट कार्ड, एसबीआय क्रेडिट कार्डसह घेतल्यास 1,500 रुपयांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध असेल. हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि तो MediaTek G96 प्रोसेसरसह येतो.

Vivo 75 5G आणि Vivo Y35 देखील सेलमध्ये ऑफरवर खरेदी केले जाऊ शकतात. ICICI आणि SBI क्रेडिट कार्डद्वारे डिव्हाइस घेतल्यावर 1,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. ग्राहक भारतात 31 डिसेंबरपर्यंत या स्मार्टफोन सीरिजवर कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com