Vivo V60 5G : विवो लवकरच लाँच करणार स्वस्तात मस्त मोबाईल; 6500mAh बॅटरी, 50MP फ्रंट कॅमेरा अन् जबरदस्त फीचर्स, पाहा एका क्लिकवर

Vivo V60 5G Smartphone Launch in India : Vivo V60 5G हा स्मार्टफोन 12 ऑगस्टला भारतात लाँच होणार आहे, यात 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 6500mAh बॅटरी आहे. याच्याबद्दल सविस्तर जाणून घ्या
Vivo V60 5G mobile features
Vivo V60 5G mobile launch dateesakal
Updated on

Vivo त्यांच्या V सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Vivo V60 5G लवकरच भारतीय बाजारात सादर करणार आहे. हा स्मार्टफोन 12 ऑगस्टला दुपारी 12 वाजता लाँच होणार असून, यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनचा समावेश आहे. कंपनीने या फोनचे काही प्रमुख फीचर्स आणि डिझाइनची माहिती उघड केले असून, हा फोन गोल्ड, मिस्ट ग्रे आणि मूनलिट ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Vivo V60 5G मध्ये 6.67 इंचाचा 1.5 K AMOLED डिस्प्ले असणार आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येईल. हा डिस्प्ले क्वाड कर्व्हड डिझाइनसह येतो, ज्यामुळे फोनला प्रीमियम लूक मिळेल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर आहे, जो अँड्रॉइड 15 आधारित फनटच ओएस 15 वर कार्यरत आहे. यामुळे फोनची कामगिरी अत्यंत वेगवान आणि सुरळीत असेल.

Vivo V60 5G mobile features
Gemini Deep Think : गुगल जेमिनीमध्ये 'Deep Think' ची एन्ट्री; कसं वापराल हे गेमचेंजर फीचर, काय आहेत फायदे? जाणून घ्या

कॅमेरा प्रेमींसाठी हा फोन खास आहे. यात 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलच्या टेलिफोटो लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्सही आहे, जो उत्तम फोटोग्राफीचा अनुभव देईल. याशिवाय, फोनमध्ये 6500mAh ची दमदार बॅटरी आणि 90 वॉट फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळे दीर्घकाळ वापर आणि जलद चार्जिंग शक्य होईल.

Vivo V60 5G mobile features
Black Mirror : सब्सक्रिप्शनचा मायाजाल; झोपेपासून आनंदापर्यंत मनुष्याला सर्व गोष्टींसाठी मोजावे लागणार पैसे? नेमका विषय काय जाणून घ्या

Vivo V60 5G मध्ये अनेक एआय फीचर्सही असतील, जसे की गुगल जेमिनी लाईव्ह, एआय कॅप्शन आणि स्मार्ट कॉल असिस्टंट. याशिवाय, IP68 आणि IP69 रेटिंगमुळे हा फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरमुळे सुरक्षाही मजबूत आहे.Vivo V60 5G च्या लाँचिंगसाठी चाहते उत्सुक आहेत. हा फोन स्टायल, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्सचा अनोखा संगम ठरणार आहे.

Vivo V60 5G mobile features
21 हजारचा मोबाईल मिळतोय 11 हजारात; Motorola G85 स्मार्टफोनवर 50% डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर

FAQs

  1. When will the Vivo V60 5G be launched in India? / व्हिवो व्ही60 5G भारतात कधी लाँच होईल?
    Vivo V60 5G 12 ऑगस्टला दुपारी 12 वाजता भारतात लाँच होईल.

  2. What are the key camera features of the Vivo V60 5G? / व्हिवो व्ही60 5G चे प्रमुख कॅमेरा फीचर्स काय आहेत?
    यात 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, तसेच 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आहे.

  3. What is the battery capacity of the Vivo V60 5G? / व्हिवो व्ही60 5G ची बॅटरी क्षमता काय आहे?
    या स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची बॅटरी आहे, जी 90 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

  4. Which processor powers the Vivo V60 5G? / व्हिवो व्ही60 5G मध्ये कोणता प्रोसेसर आहे?
    हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसरवर काम करतो.

  5. What are the AI features in the Vivo V60 5G? / व्हिवो व्ही60 5G मध्ये कोणती एआय फीचर्स आहेत?
    यात गुगल जेमिनी लाईव्ह, एआय कॅप्शन आणि स्मार्ट कॉल असिस्टंटसारखी एआय फीचर्स उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com