एकच झलक,सबसे अलग! लवकरच लॉन्च होतोय Vivo X200 FE सुपर स्मार्टफोन; दमदार फीचर्स अन् किंमत फक्त..

Vivo X200 FE हा नवीन प्रीमियम स्मार्टफोन Zeiss कॅमेरा, 90W फास्ट चार्जिंग आणि Dimensity 9300+ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हा फोन भारतात जुलैच्या मध्यात लाँच होणार आहे.
Vivo X200 FE smartphone launch
Vivo X200 FE smartphone launchesakal
Updated on

Vivo X200 FE mobile launch : विवोने आपला अत्याधुनिक स्मार्टफोन Vivo X200 FE तैवानमध्ये अधिकृतपणे लॉन्च केला असून, तो भारतात जुलैच्या मध्यात म्हणजेच १४ ते १९ तारखेदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. दमदार प्रोसेसर, Zeiss सह-निर्मित ट्रिपल कॅमेरा, आकर्षक AMOLED डिस्प्ले आणि 90W फास्ट चार्जिंग यासह हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करणार आहे.

डिझाईन आणि डिस्प्ले

Vivo X200 FE मध्ये 6.31 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1.5K रिझोल्यूशन (2640x1216 पिक्सेल) आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 460 PPI च्या पिक्सेल डेन्सिटीमुळे गेमिंग आणि स्ट्रिमिंगसाठी अत्यंत शार्प आणि जिवंत व्हिज्युअल अनुभव मिळतो. फक्त 186 ग्रॅम वजन आणि 7.99 मिमी जाडी असलेल्या या फोनला ग्लास बॅक दिला असून तो चार स्टायलिश रंगांत उपलब्ध आहे जे आहेत मॉडर्न ब्लू, लाइट हनी यलो, फॅशन पिंक, मिनिमलिस्ट ब्लॅक.

प्रोसेसर आणि OS

हा स्मार्टफोन MediaTek चा अत्याधुनिक Dimensity 9300+ चिपसेट वापरतो, जो Android 15 आधारित Funtouch OS 15 वर चालतो. 12GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS 3.1 स्टोरेजसह तो जलद आणि स्मूथ कामगिरीची खात्री देतो. यात 12GB पर्यंत व्हर्च्युअल RAM सपोर्टही देण्यात आला आहे, जो मल्टीटास्किंगला अजून वेगवान करतो.

Vivo X200 FE smartphone launch
Israel-Iran War : इस्त्रायल-इराण संघर्ष शिगेला! इस्त्रायलचा न्यूक्लियर सायबर हल्ला; ‘मोसाद’चा धक्कादायक कारनामा उघड, पुढे जे झालं...

Zeiss सह असलेली AI ट्रिपल कॅमेरा सेटअप

Vivo X200 FE मध्ये Zeiss च्या सहयोगाने विकसित केलेली शक्तिशाली ट्रिपल कॅमेरा प्रणाली आहे

  • 50MP IMX921 मुख्य सेन्सर

  • 50MP टेलीफोटो लेन्स

  • 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स

फ्रंटला दिला आहे एक 50MP वाईड अँगल सेल्फी कॅमेरा, जो 4K 60fps रेकॉर्डिंगसाठी बेस्ट आहे. AI च्या मदतीने कमी प्रकाशात चांगल्या फोटोसाठी डायनॅमिक रेंज आणि इमेज क्लॅरिटी सुधारण्यात आली आहे.

Vivo X200 FE smartphone launch
Cyber Security : तब्बल 1600 कोटी पासवर्ड अन् ईमेल लीक! गुगलने सांगितली ट्रिक; हॅकिंगपासून स्वतःला सुरक्षित ठेवा एका क्लिकवर..

बॅटरी आणि चार्जिंग

या फोनमध्ये 6,500mAh क्षमतेची बॅटरी असून ती 90W अल्ट्रा-फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे दीर्घकाळ वापरानंतरही केवळ काही मिनिटांत बॅटरी चार्ज करता येते. याशिवाय फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल SIM (eSIM सपोर्टसह), Bluetooth 5.4, USB Type-C, आणि NFC अशा आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

ड्युराबिलिटीमध्येही टॉप क्लास

Vivo X200 FE ला IP68 आणि IP69 सर्टिफिकेशन प्राप्त झाले आहे, म्हणजेच हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे Outdoor आणि Heavy usage करणाऱ्यांसाठी हा एक विश्वासार्ह पर्याय ठरतो.

Vivo X200 FE हा एक परिपूर्ण प्रीमियम स्मार्टफोन आहे, जो स्टाईल, परफॉर्मन्स आणि टिकाऊपणाचा उत्कृष्ट मिलाफ देतो. भारतात तो लॉन्च झाल्यानंतर OnePlus, Samsung आणि iQOO सारख्या ब्रँड्सना जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन प्रेमींना एक अत्याधुनिक, AI आधारित आणि फास्ट चार्जिंग अनुभव हवा असेल, तर Vivo X200 FE हा निश्चितच एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com