esakal | Vivo X70 सीरीज लवकरच भारतात होणर लॉंच, जाणून घ्या डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Vivo X70

Vivo X70 सीरीज लवकरच भारतात होणर लॉंच, जाणून घ्या डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

स्मार्टफोन कंपनी Vivo ने एक पोस्टर रिलीज करून आपल्या लेटेस्ट Vivo X70 सीरीज भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Vivo X70 सीरीजच्या Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus हे स्मार्टफोन येत्या 30 सप्टेंबरला भारतात लॉंच करण्यात येणार आहे. चला तर मग या सीरीजचे फीचर्स जाणून घेईयात

Vivo X70 सीरीज फोनच्या किंमती काय असतील?

काही रिपोर्टनुसार कंपनी Vivo X70 Pro Plus ची किंमत 84,990 रुपये ठेवू शकते. तसेच सीरीजच्या बेस मॉडेल Vivo X70 ची किंमत 40 ते 50 हजारांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. तर त्याचे अपडेटेड मॉडेल Vivo X70 Pro हा फोन 50 ते 60 हजार रुपयांच्या किंमतीला ग्राहक खरेदी करु शकतील. तसेच सध्या Vivo X70 सरीजच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

Vivo X70

Vivo X70 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंच HD प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. ज्याचे रिझोल्यूशन 1,080x2,376 पिक्सेल असेल. तर त्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. ड्युअल-सिम स्लॉट देण्यात आलेला हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. याशिवाय फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरचा सपोर्ट मिळू शकतो.

हेही वाचा: भारतातील 'या' आहेत सर्वात स्वस्त सेडान कार, पाहा किंमत

Vivo X70 Pro

चांVivo X70 Pro मध्ये 4,450mAh ची बॅटरी आणि Exynos 1080 प्रोसेसर असेल. यासोबतच फोनमध्ये एचडी डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईळ ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP पेरिस्कोप लेन्स आणि दोन 12MP सेन्सर असतील. तर सेल्फीसाठी फोनच्या समोर 32 एमपी कॅमेरा असेल.

Vivo X70 Pro+

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल ज्याचा आस्पेक्ट रेशो 20: 9 आणि रिफ्रेश रेट 120Hz असेल. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर आणि 12GB रॅम दिली असून या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 48MP Sony IMX598 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 12MP पोर्ट्रेट लेन्स आणि 8MP टेलिफोटो लेन्स असतील. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 एमपी कॅमेरा उपलब्ध असेल

हेही वाचा: Samsung F सीरीजचा पहिला 5G फोन, 29 सप्टेंबरला होणार लॉंच

loading image
go to top