Vivo ने भारतात लॉंच केला स्वस्त स्मार्टफोन; मिळतो 50MP चा दमदार कॅमेरा

vivo y22 launched in india with 50mp camera price and features
vivo y22 launched in india with 50mp camera price and features

Vivo India ने आपला नवीन फोन Vivo Y22 भारतात लॉन्च केला आहे. Vivo Y22 कंपनीच्या Y सीरीजमधील हा लेटेस्ट फोन आहे. Vivo Y22 ला एक प्रीमियम लुक देण्यात आला आहे. याशिवाय, 2.5D ट्रेंडी डिझाइन देखील या मध्ये मिळते. Vivo Y22 मध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा दिला असून यामध्ये सुपर नाईट मोड दिला आहे. याशिवाय Vivo च्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे ज्यासोबत फास्ट चार्जिंग देखील आहे.

Vivo Y22 ची किंमत किती आहे?

Vivo Y22 च्या 4 GB रॅम आणि 64 GB व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्येही सादर करण्यात आला आहे, मात्र कंपनीने त्याच्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही. Vivo Y22 स्टारलिट ब्लू आणि मेटाव्हर्स ग्रीन रंगात खरेदी केला जाऊ शकतो. काही ठराविक बँक कार्ड असलेल्या फोनसह 1,000 कॅशबॅक उपलब्ध असेल.

Vivo Y22 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y22 मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. याशिवाय Android 12 सह Funtouch OS 12 देण्यात आला आहे. तसेच यात 6.55-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळतो, ज्याचा आस्पेक्ट रेशो 89.67 आहे. Vivo Y22 च्या डिस्प्लेची ब्राइटनेस 530 nits आहे. तसेच Vivo Y22 मध्ये MediaTek Helio G85 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. RAM 2 GB पर्यंत वाढवता येते.

vivo y22 launched in india with 50mp camera price and features
जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी

Vivo Y22 कॅमेरा

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, या Vivo फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे, ज्यामध्ये अपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेन्स 2-मेगापिक्सलची असून ऍपर्चर f/2.4 आहे. Vivo Y22 मध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Vivo Y22 बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी, ivo Y22 मध्ये ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth v5, GPS, Glonass, NFC, OTG, FM रेडिओ आणि Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Vivo Y22 मध्ये 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी दिली असून Vivo Y22 ला वॉटर रेसिस्टंटसाठी IP54 रेट केले गेले आहे आणि फोनचे एकूण वजन 190 ग्रॅम आहे.

vivo y22 launched in india with 50mp camera price and features
जाणून घ्या,काय आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामधला फरक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com