वर्षभरासाठी मोफत मिळेल Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन, फक्त करा हा 'रिचार्ज' |Best Recharge Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Disney+ Hotstar Subscription

Best Recharge Plans: वर्षभरासाठी मोफत मिळेल Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन, फक्त करा 'हा' रिचार्ज

Free Disney+ Hotstar Subscription: टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये अनेक बेनिफिट्स देत आहे. अनलिमिटेड डेटा, डेली कॉलिंग यासोबतच ओटीटी बेनिफिट्स देखील प्लान्समध्ये मिळत आहे. तुम्ही जर Vodafone Idea (Vi) चे ग्राहक असल्यास कंपनीकडे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

वीआयच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये तुम्हाला वर्षभरासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कंपनीकडे १५१ रुपये आणि ३९९ रुपये किंमतीचे असे दोन शानदार प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्रीपेड प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वोडाफोन आयडियाचा १५१ रुपयांचा प्रीपेड प्लान

वीआयकडे १५१ रुपयांचा प्रीपेड ४जी डेटा वाउचर उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सला मोफत डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते. मात्र, हा एक केवळ डेटा वाउचर आहे. या डेटा वाउचरचा वापर करण्यासाठी बेस अ‍ॅक्टिव्ह प्लॅन असणे गरजेचे आहे.

१५१ रुपयांच्या या डेटा वाउचरमध्ये तुम्हाला ८ जीबी डेटा आणि ३० दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये ३ महिन्यांसाठी Disney+ Hotstar Mobile चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

हेही वाचा: iPhone 14 offer: स्वस्तात घरी घेऊन जा आयफोन, हजारो रुपयांची मिळत आहे सूट

वोडाफोन आयडियाचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

वीआयकडे ३९९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवस असून, यामध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळते. यात वीआय मूव्हीज अँड टीव्हीच्या सबस्क्रिप्शनसह हीरो अनलिमिटेडचे बेनिफिट दिले जाते. विशेष म्हणजे तुम्हाला या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. म्हणजेच, तुम्हाला डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

टॅग्स :ViVodafonerecharge