Vodafone-Idea चे पाच नवे प्रीपेड प्लान लाँच; पहा कोणता स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vodafone Idea's new prepaid plans

Vodafone-Idea चे पाच नवे प्रीपेड प्लान लाँच; पहा कोणता स्वस्त

वोडाफोन-आयडिया (Vi) पाच नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहे. हे प्लान लागू करण्यात आले आहेत. यात 29 रुपये, 39 रुपये, 98 रुपये, आणि 319 रुपये या प्रीपेड प्लॅनचा समावेश आहे

या प्रीपेड प्लॅनचा फायदा स्वस्त रिचार्च करु इच्छीत असणाऱ्यांना नक्कीच होणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सनी प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्यापासून ग्राहक त्रासले होते मात्र आता वोडाफोन-आयडियाने आणलेल्या या प्रीपेड प्लानमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे (vodafone Idea has add five new prepaid plans to its list check new plans)

हेही वाचा: तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे व्यवहार; कोणत्या कंपनीची कितीला विक्री ?

वोडाफोन-आयडिया (Vi) च्या या पाच नवीन प्रीपेड प्लानबद्दल जाणून घ्या-

1. 29 रु. प्रीपेड प्लॅन - हा एक अॅड ऑन प्लॅन आहे. तुम्ही तुमचा दैनंदिन डेटा संपवल्यावर तुम्ही २९ रुपयांचे रिचार्ज करू शकता. हा प्रीपेड प्लॅन 2 दिवसांच्या वैधतेसह 2GB डेटाच्या दैनंदिन डेटासह येतो.

2. 39 रु. प्रीपेड प्लॅन- हा प्रीपेड प्लॅन 4G डेटा व्हाउचर देखील आहे. या प्लॅनमध्ये 3GB FUP डेटाचा समावेश आहे. हा प्लॅन 7 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्रीपेड प्लॅन सध्या फक्त गुजरात सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा: डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा

3. 98 रु. प्रीपेड प्लॅन - हा प्रीपेड प्लॅन दोन वेगवेगळ्या सर्कलमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात हा प्रीपेड प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 200MB डेटा आणि 15 दिवसांची वैधता ऑफर करतो. Telecom Talk नुसार, 98 रु, प्रीपेड प्लॅन हा 4G डेटा व्हाउचर देखील आहे आणि 21 दिवसांसाठी 9GB डेटासह येतो.

4. 195 रु. प्रीपेड प्लॅन - या प्रीपेड प्लॅनमध्ये 300 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह 2GB FUP डेटा मिळतो. प्रीपेड प्लॅन 31 दिवसांच्या वैधतेसह येतो.

5. 319 रु प्रीपेड प्लॅन - व्होडाफोनने सादर केलेला हा सर्वात महागडा प्लान आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/दिवस आणि दररोज 2GB डेटा मिळतो. इतर फायद्यांमध्ये B Binge All Night, Data Rollover आणि Data Delights यांचा समावेश होतो.

Web Title: Vodafone Idea Has Add Five New Prepaid Plans To Its List Check New Plans

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top