कुटुंबासाठी Vi चे खास प्लॅन, मिळतं वर्षभर मोफत नेटफ्लिक्स अन् बरंच काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vodafone idea redx family postpaid plans offer unlimited-data calls free-netflix annual membership

कुटुंबासाठी Vi चे खास प्लॅन, मिळतं वर्षभर मोफत नेटफ्लिक्स अन् बरंच काही

कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांना रिचार्ज करून कंटाळाला असाल तर आज आपण अशा दोन प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी फक्त एका रिचार्ज पुरेसे ठरणार आहे. म्हणजेच वेगळे रिचार्ज करण्याचा त्रास राहणार नाही. हा प्लॅ Vodafone Idea (Vi) चा REDX फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. या फॅमिली पोस्टपेड प्लॅनचा उद्देश कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र मोबाइल बिल भरण्याचा ताण कमी करणे हा आहे. प्लॅन अमर्यादित कॉल्स आणि डेटासह भरपूर OTT बेनिफीट्स देखील देतात. चला Vodafone Idea REDX प्लॅन्सवर एक नजर टाकूया जो तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी लगेच खरेदी करू शकता.

Vodafone Idea REDX फॅमिली पोस्टपेड प्लॅन

Vodafone Idea कडे फॅमिली कॅटेगरी अंतर्गत दोन REDX प्लॅन आहेत. या दोन्ही प्लॅनची ​​किंमत 1699 रुपये आणि 2299 रुपये आहे. चला या दोन प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती घेऊया

Vodafone Idea चा 1699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Vodafone Idea च्या 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, अमर्यादित डेटा (कोणत्याही दैनिक किंवा मासिक मर्यादेशिवाय) आणि 3000 SMS प्रति महिना येतो. हे फायदे प्रायमरी कनेक्शनसाठी आहेत. योजनेअंतर्गत एकूण तीन कनेक्शन देण्यात आले आहेत. सेंकंडरी कनेक्शनसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि अमर्यादित डेटा तसेच दरमहा 3000 एसएमएस ऑफर करतो . परंतु सर्वात मोठा फरक प्रायमरी आणि सेंकंडरी कनेक्शनच्या बेनिफीट्समध्ये आहे.

हेही वाचा: रेडमी प्राइम सीरीजचे दोन फोन भारतात लॉन्च, कमी किमतीत मिळेल खूप काही

प्रायमरी कनेक्शन फ्री Netflix वार्षिक सब्सस्क्रिप्शन, Amazon Prime, Disney Plus Hotstar Mobile, ZEE5 प्रीमियम, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय (वर्षातून 4 वेळा) तसेच सहा विमानतळ लाउंजमध्ये एक्सेस Vi अॅपमध्ये मासिक विनामूल्य हंगामा म्यूजीक आणि Vi म्यूव्हीज आणि टीव्ही VIP एक्सेस मिळतो. परंतु सेकंडरी कनेक्शनला प्रायमरी कनेक्शनसाठी नमूद केलेले शेवटचे दोन फायदे मिळतात. प्लॅनच्या किमतीत GST समाविष्ट नाही. लक्षात घ्या की हा प्लॅन सहा महिन्यांच्या लॉक-इन कालावधीसह येते आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या कालावधीत ते वापरणे थांबवायचे असल्यास, तुम्हाला 3000 रुपये एक्झिट फी भरावी लागेल. प्रायमरी कनेक्शनला सात दिवसांसाठी iRoamFree पॅक (किंमत 2,999 रुपये) देखील मिळतो.

हेही वाचा: थोडं थांबा! iPhone14 लॉन्च होताच, iPhone 13 होणार २० हजारांनी स्वस्त

Vodafone Idea चा 2299 चा पोस्टपेड प्लॅन

हा प्लॅन वर नमूद केलेल्या 1699 च्या प्लॅन सारखाच आहे. सर्व फायदे, तसेच अटी व शर्ती, 1699 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच राहतील. फरक एवढाच आहे की तुम्हाला 3 कनेक्शनऐवजी 5 कनेक्शन मिळतात. एक कनेक्शन प्रायमरी कनेक्शन आहे, आणि बाकीचे सेकंडरी कनेक्शन आहेत.

Web Title: Vodafone Idea Redx Family Postpaid Plans Offer Unlimited Data Calls Free Netflix Annual Membership

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology