रेडमी प्राइम सीरीजचे दोन फोन भारतात लॉन्च, कमी किमतीत मिळेल खूप काही

redmi 11 prime 5g and redmi 11 prime 4g smartphone launched in india check specifications price here
redmi 11 prime 5g and redmi 11 prime 4g smartphone launched in india check specifications price here

Redmi India ने आपले नवीन बजेट सेगमेंट स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G आणि Redmi 11 Prime 4G भारतात लॉन्च केले आहेत. Redmi 11 Prime 5G पोको M4 5G च्या रीब्रँडेड आवृत्तीच्या स्वरूपात सादर करण्यात आला आहे. Poco M4 5G या वर्षी एप्रिलमध्ये लॉन्च झाला होता. Redmi 11 Prime 5G 50 मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. त्याच वेळी, Redmi 11 Prime 4G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देणयात आले आहे. Redmi 11 Prime च्या 5G व्हेरिएंटमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 4G व्हेरिएंटमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आले आहे. जाणून घेऊया या फोनचे इतर फीचर्स आणि किंमत...

Redmi 11 प्राइम सीरीजची किंमत

Redmi 11 Prime 5G भारतात मिडो ग्रीन, क्रोम सिल्व्हर आणि थंडर ब्लॅक कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनच्या 4GB रॅमसह 64GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 13,999 रुपये आणि 128GB स्टोरेजसह 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. त्याच वेळी, Redmi 11 Prime 4G च्या 4GB रॅमसह 64GB स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आणि 128GB स्टोरेजसह 6GB रॅमची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही फोन 9 सप्टेंबरपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Mi Home, Amazon India आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवरून खरेदी केले जाऊ शकतात.

redmi 11 prime 5g and redmi 11 prime 4g smartphone launched in india check specifications price here
Redmi A1 : रेडमीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन भारतात लॉंच, जाणून घ्या डिटेल्स

Redmi 11 Prime 5G - स्पेसिफीकेशन्स

फोनमध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे, जो 1,080x2,400 पिक्सेल रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits ब्राइटनेससह येतो. यात गोरिला ग्लास 3 चे संरक्षण देखील आहे. फोनमध्ये 7nm octa-core MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G57 सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 6GB रॅमसह 128GB UFS 2.2 स्टोरेज दिले आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.

Redmi 11 Prime 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा f/1.8 अपर्चरसह येतो आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेल f/2.4 अपर्चरसह उपलब्ध आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोन 5,000mAh बॅटरीसह येतो आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, USB OTG, USB Type-C पोर्ट, Bluetooth v5 आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखी वैफीचर्स शिष्ट्ये उपलब्ध आहेत.

redmi 11 prime 5g and redmi 11 prime 4g smartphone launched in india check specifications price here
Apple iPhone: 7 तारखेला होणार iphone 14 लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन

Redmi 11 Prime 4G चे स्पेसिफीकेशन्स

Redmi 11 Prime 4G मध्ये 6.58-इंच फुलएचडी+ IPS डिस्प्ले आहे, 5G व्हेरिएंटप्रमाणेच 1,080x2,400 पिक्सेल रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits ब्राइटनेस देण्यात आली आहे. या फोनमध्ये गोरिला ग्लास 3 चे संरक्षण देखील देण्यात आले आहे. Redmi 11 Prime 4G मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि Mali-G57 MC2 ग्राफिक्स कार्ड सपोर्ट दिला आहेत. फोनला 6GB पर्यंत LPDDR4x रॅमसह 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळते. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने याची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

Redmi 11 Prime 4G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा f/1.8 अपर्चरसह येतो. तसेच 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देखील मिळते, जी 18W फास्ट चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5, USB OTG, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सपोर्ट करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com