esakal | Vodafone-Idea ची धमाकेदार ऑफर; जाणून घ्या भन्नाट प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

Vodafone-Idea ची धमाकेदार ऑफर; जाणून घ्या भन्नाट प्लॅन

Vodafone-Idea ची धमाकेदार ऑफर; जाणून घ्या भन्नाट प्लॅन

sakal_logo
By
अक्षय साबळे

नवी दिल्ली : देशातील मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. मात्र, कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लॅन्स बाजारात आणत असते. आता कंपनीने Airtel आणि Jio ला टक्कर देणारा प्लॅन आणला आहे. 555 रुपयांच्या ह्या प्लॅन बद्दलआपण जाणून घेणार आहोत.

VI चा 555 रुपयांचा प्लॅन

७७ दिवसांची वैधता असणाऱ्या VI च्या या प्लॅनमध्ये प्रतिदिवस १.५ जीबी डेटा, १०० SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा प्राप्त होते. तसेच, बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओवर आणि VI App वापरता येते.

Reliance Jio चा 555 वाला प्लॅन

८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, Jio App, JioNews, JioCloud, JioSecurity या सुविधा मिळतात.

VI की Jio कोणता प्लॅन चांगला?

VI च्या ५५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये शनिवार आणि रविवारी आठवड्याचा बाकी डेटा मिळतो. तसेच, VI रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत अनलिमिटेड डेटा ग्राहकांना देते. जर ग्राहकांना जास्तीचा डेटा हवा, असेल Jio चा प्लॅन फायदेशीर ठरेल. VI प्लॅनची वैधता ७७ दिवसांची आणि Jio ची वैधता ८४ दिवसांची आहे.

loading image
go to top