Vodafone Network
Vodafone Networkesakal

Vodafone SMS : जगातील पहिल्या 'SMS'चा लिलाव

Summary

जगातील पहिल्या मजकूर संदेशाचा म्हणजेच, एसएमएसचा (SMS) लिलाव पॅरिसमध्ये झाला.

जगातील पहिल्या मजकूर संदेशाचा (SMS) म्हणजेच, एसएमएसचा लिलाव पॅरिसमध्ये झाला. या एसएमएसची किंमत 91 लाखांपेक्षा जास्त आहे. एका अज्ञात व्यक्तीनं हा SMS विकत घेतलाय. पॅरिसमधील (Paris) Agats हाऊसनं सांगितलं, की 1992 मध्ये मोबाईल फोनवर पाठवलेला पहिला एसएमएस मंगळवारी झालेल्या लिलावात NFT स्वरूपात $1,21,600 म्हणजेच, 91 लाख 15 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकला गेला. या पहिल्या एसएमएसच्या खरेदीदाराची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

या एसएमएसचा लिलाव NFT म्हणजेच, Non-Fungible टोकनच्या स्वरूपात करण्यात आला. आता हा एसएमएस NFT मध्ये रूपांतरित झालाय. पहिला एसएमएस व्होडाफोनचे (Vodafone Network) कर्मचारी रिचर्ड जार्विस यांना पाठवण्यात आला होता. 'मेरी ख्रिसमस'च्या शुभेच्छा देणारा 15 शब्दांचा हा SMS होता. कंपनीच्या ख्रिसमस पार्टीत सहभागी होताना प्रोग्रामर नील पापवर्थनं त्याचा सहकारी जार्विसला हा संदेश पाठवला होता. या एसएमएसचा खरेदीदार बिटकॉइननंतर दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी इथरमध्ये पैसे देईल. NFT म्हणजे काय? NFT म्हणजे, Non-Fungible टोकन. अर्थव्यवस्थेतील मालमत्ता ही अशी आहे, जी हातानं देवाण-घेवाण केली जाऊ शकते. जसं तुमच्याकडं 100 रुपयांची नोट आहे, ती देऊन तुम्ही 50-50 रुपयांच्या दोन नोटा घेऊ शकता.

Vodafone Network
PHOTO : Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा

व्होडाफोन या पैशाचं काय करेल? याबाबत व्होडाफोननं सांगितलं, की युनायटेड नेशन्स रिफ्यूजी एजन्सीला (UNHCR) विक्रीचे पैसे देईल. ख्रिश्चन शाके म्हणाले, अभुतपूर्व तंत्रज्ञान आणि सामाजिक हितासाठी चळवळीच्या माध्यमातून आम्ही UNHCR ला मदत करत राहू. निर्वासित आणि ज्यांना घरातून पळून जाण्यास भाग पाडलं गेलं, अशा लोकांना त्यांचं जीवन उज्वल करण्यासाठी आम्ही आर्थिक मदत देखील करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

Vodafone Network
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार?

1992 मध्ये पाठवला पहिला SMS

जगातील पहिला एसएमएस 3 डिसेंबर 1992 रोजी व्होडाफोन नेटवर्कद्वारे पाठवण्यात आला होता. सुमारे तीन दशकांपूर्वी पाठवण्यात आलेल्या या एसएमएसमध्ये 'मेरी ख्रिसमस'चा (Merry Christmas) संदेश होता. व्होडाफोनचे कर्मचारी रिचर्ड जार्विस यांनी हा एसएमएस स्वीकारला होता. दरम्यान, जगातील पहिल्या SMS NFT चा लिलाव 21 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये (Paris) होणार आहे. लिलावात बोली लावण्यासाठी तुम्ही ऑनलाइन देखील सहभाग घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com