ध्वनीप्रदूषणामुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

शहरातील वाहनांच्या रहदारीमुळे पक्ष्यांच्या पिलांचे जीव धोक्‍यात आले असून, त्यामुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे,असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नुकतेच नोंदवले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या छोट्या पिलांना त्यांच्या पालकांचा आवाज ऐकण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे ते भुकेले राहतात आणि भक्ष्याला बळी पडतात. नोवा स्कॉटिया मधील डलहौसी विद्यापीठातील संशोधकांनी अन्नासाठी आणि स्वसंरक्षणासाठी पूर्णपणे पालकांवर अवलंबून असलेल्या आणि उडू न शकणाऱ्या पिलांचा अभ्यास केला.

शहरातील वाहनांच्या रहदारीमुळे पक्ष्यांच्या पिलांचे जीव धोक्‍यात आले असून, त्यामुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे,असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नुकतेच नोंदवले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या छोट्या पिलांना त्यांच्या पालकांचा आवाज ऐकण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे ते भुकेले राहतात आणि भक्ष्याला बळी पडतात. नोवा स्कॉटिया मधील डलहौसी विद्यापीठातील संशोधकांनी अन्नासाठी आणि स्वसंरक्षणासाठी पूर्णपणे पालकांवर अवलंबून असलेल्या आणि उडू न शकणाऱ्या पिलांचा अभ्यास केला. पक्षी खाऊ घेऊन येताना व शत्रूपासून सावध होण्यासाठी करीत असलेल्या सूचनांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग पिलांना ऐकविण्यात आले. यातील काही रेकॉर्डिंगमध्ये मागून खूप गोंगाट ऐकू येत होता. गोंगाट असलेल्या रेकॉर्डिंमुळे पिलांना भुकेची माहिती देण्यात किंवा सावध होण्याच्या सूचना घेण्यात अडचणी आल्या व त्या त्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे आढळून आले. संशोधक अँडी हॉर्न म्हणाले,""शहरातील रहदारीचा आवाज, इमारतींचे बांधकाम किंवा इतर गोंगाटामुळे पक्षी आणि त्यांच्या पिलांमधील संवाद तुटतो. यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण होत आहे.''
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voice birds being threatened by pollution

टॅग्स