esakal | Whatsapp चे नवे फिचर; चॅटमधील फोटो आपोआप होणार डिलीट
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp.

आपल्या स्मार्टफोनमधील सगळ्यात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅपमधील स्टेटस, डिस्पेपिच्चर, स्टिकर्स या फिरचर्सचा वापर आपण नेहमीच करत असतो. पण आता व्हॉट्सअ‍ॅप एक नविन फिचर घेऊन येणार आहे.

Whatsapp चे नवे फिचर; चॅटमधील फोटो आपोआप होणार डिलीट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

आपल्या स्मार्टफोनमधील सगळ्यात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅपमधील स्टेटस, डिस्पेपिच्चर, स्टिकर्स या फिरचर्सचा वापर आपण नेहमीच करत असतो. पण आता व्हॉट्सअ‍ॅप एक नविन फिचर घेऊन येणार आहे. या फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅटमधील पाठवलेले फोटो आपोआप डिलीट होतील. व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅक करणारी वेब साईट WABetaInfo या नव्या फिचर संदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये WABetaInfoने असा दावा केला आहे की, व्हॉट्सअ‍ॅप सेल्फ-डिस्ट्रक्टिंग फीचरची चाचणी घेत आहे. andoird आणि ISO या दोन्ही वापरकर्त्यांसाठी या फिचरचे टेस्टिंग केले आहे. WABetaInfo असेही म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपमधील सेल्फ- डिस्ट्रक्टिंग मोडमध्ये पाठवलेले फोटो कोणालाही पुन्हा पाठवता येणार नाहीत. हे फोटो युजरला फोनच्या गॅलरीमध्ये दिसणार नाही.

WABetaInfo ट्विटमध्ये असे सांगितले की, एखाद्या व्यक्तीने सेल्फ-डिस्ट्रक्टिंग मोडमधील फोटोचा जर स्क्रिनशॉट घेतला तर तो फोटो पाठवणाऱ्या युजरला त्याची माहिती मिळणार नाही. गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने 'डिसअपियर मेसेज'नावाचे फिचर लॉंच केले होते. या फिचरमध्ये तुम्ही पाठवलेले मेसेज सात दिवसानंतर डिलीट होतात. या मेसेजमध्ये जर तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ पाठवला असेल तरी देखील ती फाईल डिलीट होते.

WhatsApp झाले १२ वर्षांचे, प्रत्येक दिवशी होतात एक अब्जापेक्षा जास्त काॅल

तसेच या फिचरसोबतच 15 मे पासून व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी लागू होणार आहे. जानेवारीमध्येच या संबंधीत माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिला होती. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नाही तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपचा  एखादा वापरकर्ता डेटा कशा पद्धतीने ऑर्गनाइज करतो तसेच फेसबुक कंपनीसोबत कशी माहिती शेअर करतो याबद्दलचे धोरणं या नव्या व्हॉट्सअ‍ॅप अपडेटमध्ये असणार आहे.

loading image
go to top