ऑनलाईन विक्री करायचीय? मग अशी मारा 'सिक्सर'!

Online-Sailing
Online-Sailing

वेबसाइट तयार करणे Wix (http://wix.com/)
कोणत्याही छोट्या व्यवसायासाठी पहिले साधन म्हणजे ज्या ठिकाणी ते त्यांची उत्पादने आणि ब्रँड प्रदर्शित करू शकतील अशी वेबसाइट तयार करणारा प्लॅटफॉर्म. 

विक्स यासाठी एकदम योग्य आहे. विक्स वेबसाइट तयार करण्याची प्रक्रिया एकदम सोपी करून टाकते. एकीकडे ही प्रक्रिया सोपी करताना त्याच वेळी अतिशय एकमेवाद्वितीय सुंदर अशा टेंप्लेट्सचे वैविध्य आणि अशा टेंप्लेट्समध्ये पाहिजे तसे बदल करण्याचे स्वातंत्र्यही ही वेबसाइट उपलब्ध करून देते. कोणत्याही वेबसाइटमध्ये फंक्शनल म्हणजे प्रत्यक्ष वापरण्यासाठीच्या सोयी या जितक्या महत्त्वाच्या असतात, तितकेच तिचे सौंदर्यमूल्यही महत्त्वाचे असते, ही गोष्ट विक्सने लक्षात ठेवली आहे. त्यामुळे उद्योजकांना वेबसाइट तयार करताना या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखता येईल, अशी सोय ते उपलब्ध करून देतात. विक्स दर महिन्याला सर्वसाधारणपणे ८० ते ३२५ रुपये (आकारणी वार्षिक) शुल्क आकारते. मात्र, शक्यतो उद्योजकांनी मासिक १८५ रुपयांची योजना निवडावी अशी आमची शिफारस आहे-कारण त्यात व्हिजिटर ॲनॅलिटिक्स आणि साइट बूस्टर्ससारख्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात-ज्यामुळे कोणत्याही बिझनेस साइटची कामगिरी उंचावते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विक्रीसाठीचे (ई-कॉमर्स) पोर्टल तयार करणे Shopify (http://shopify.com/)
एकदा का तुमचा वेबसाइटचा सेटअप पूर्ण झाला, की प्रत्येक उद्योजकाला गरज असते अशा सॉफ्टवेअरची ज्याच्यामुळे तुम्ही तुमची उत्पादने वेबसाइटच्या माध्यमातून विकू शकता. शॉपिफाय हे ऑनलाइन साधन यासाठी अतिशय उपयुक्त. 

शॉपिफाय हे ऑनलाइन स्टोअरफ्रंट्ससाठीच्या व्यवसायातला सोपेपणा वाढवण्यासाठीचे एक ऑनलाइन टूल आहे. तुमची स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट तयार करण्यापासून ते तुमची वेबसाइट समजा आधीपासूनच तयार असेल, तर तिच्यात ‘बाय’ बटन समाविष्ट करण्यापर्यंत वेगवेगळी साधने शॉपिफाय उपलब्ध करून देते. शॉपिफाय तुमचे स्वतःचे ई-कॉमर्स स्टोअर तयार करण्यासाठीचा पर्याय २९ डॉलर (२१४६ रुपये) प्रति महिना या शुल्कात उपलब्ध करून देते. विक्ससाठीच्या शुल्कापेक्षा ही रक्कम किती तरी जास्त आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो विक्सवर तुमची वेबसाइट तयार करा आणि त्यानंतर तुमच्या या वेबसाइटवर शॉपिफायच्या मदतीने ‘बाय’ आणि ‘चेकआऊट’ या सुविधा समाविष्ट करा, म्हणजे स्वस्त पडेल. या सुविधांचा वापर करण्यासाठीचे शॉपिफायचे शुल्क दर महिन्याला ९ डॉलर इतके आहे. विक्सवर वेबसाइट तयार करण्याचे शुल्क हे १२ डॉलर (८८० रुपये) प्रतिमहिना आहे. विक्सद्वारे तयार केलेल्या वेबसाइटसंदर्भात शॉपिफायमध्ये बिल्ट इन इंटिग्रेशन असल्याने या सुविधा समाविष्ट करणे सहज आहे आणि वेबसाइटच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये कोणता अडथळाही येणार नाही.

पोस्टर्स, सोशल मीडिया क्रिएटिव्ह जाहिरातविषयक साधने तयार करणे Canva (http://www.canva.com/)
ऑनलाइन माध्यमात यशस्वी व्हायचे असेल, तर कोणत्याही व्यवसायाला ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर आणण्यासाठी डिजिटल मार्केटिंगच्या चांगल्या पद्धतींची गरज भासेल.  कॅनव्हा हे एक ऑनलाइन ‘फ्रीमियम टूल’ आहे ज्याचा वापर करून रजिस्टर्ड युजर्स वेगवेगळ्या प्रकारची लाखो इन्फोग्राफिक्स तयार करू शकतात. कॅनव्हा युजर्सना अनेक रेडिमेड आणि एडिट करता येण्याजोग्या टेंप्लेट्स, शेकडो आयकॉन्स, शेकडो फोटो आणि इतर अनेक गोष्टी विनामूल्य उपलब्ध करून देते. नेत्राकर्षक कंटेंट तयार करण्यासाठी आवश्यक ते सगळेच. त्याच्या पुढे जाऊन कॅनव्हा सोशल मीडिया पोस्ट्ससाठी (उदाहरणार्थ, इन्स्टाग्राम स्टोरी, इन्स्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, फेसबुक कव्हर पेज इत्यादी) रेडीमेड टेंप्लेट्स उपलब्ध करून काम सोपे करते. त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या ग्राहकांसाठी परफेक्ट कंटेंट तयार करण्यात वेळ आणि कष्ट वाया घालवण्याची गरज भासत नाही. यातल्या शुल्क असलेल्या मॉडेलमध्ये (पेड मॉडेल) विशेष आयकॉन्स/फोटोजसह अतिरिक्त सुविधा समाविष्ट असल्या, तरी डिजिटल मार्केटिंगच्या प्राथमिक टप्प्यासाठी फ्री व्हर्जन पुरेसे आहे. 

सोशल मीडिया/डिजिटल मार्केटिंगबाबत व्यवस्थापन Hootsuite (www.hootsuite.com)
छोट्या व्यवसायांसाठी सोशल मीडिया मार्केटिंग ही गोष्ट अपरिहार्य असली, तरी त्याची उपयुक्तता अधिक वाढण्यासाठी उद्योजकांना काही साधनाची आवश्यकता भासते. हूटसूट (Hootsuite) हे एक ऑनलाइन साधन आहे- ज्यात एकाच प्लॅटफॉर्मचा वापर करून वेगवेगळ्या सोशल मीडिया पोस्ट्सचे व्यवस्थापन करता येते. प्राथमिक युजर्ससाठी हूटसूट ऑटोमेटेड पोस्ट्स, की परफॉर्मन्स इंडिकेटर रिपोर्टस्, तसेच कस्टम ॲनॅलिटिक्स आणि अहोरात्र सपोर्ट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मासिक शुल्क हे १,९१५ ते ४५,००० रुपयांपर्यंत (आकारणी वार्षिक) असले, तरी आमची शिफारस मासिक १,९१५ रुपयांचा पर्याय स्वीकारण्याची आहे-कारण त्याच्यात युजरला त्याच्या बिझनेस प्रोफाइलसाठी दहा सोशल प्रोफाइल्सचे व्यवस्थापन करता येते. अर्थात यशस्वी ऑनलाइन व्यवसाय चालवण्यासाठी हूटसूटसारखे साधन अनिवार्य नसले, तरी तुमचे डिजिटल मार्केटिंग स्ट्रक्चर आणि परिणामकारकता वाढवून कोणतीही ऑनलाइन कंपनी यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते हे समजणे गरजेचे आहे.  

अकाऊंटिंग सॉफ्टवेअरचा वापर Zoho Books (www.zoho.com)
तुम्ही जरी खूप ग्राहक मिळवू शकलात किंवा विक्री करू शकलात, तरी रेकॉर्डस्, कर आणि धोरणात्मक गोष्टी आदी गोष्टींच्या अकाऊंटिंगबाबत मदतीसाठीचे साधन प्रत्येक उद्योजकाकडे असणे गरजेचे असते. 

झोहो बुक्स हे एक ऑनलाइन अकाऊंटिंग साधन असून भारतातल्या प्राथमिक टप्प्यातल्या कंपन्यांसाठी ते परफेक्ट आहे. झोहो बुक्स कोणत्याही कंपनीच्या अकाऊटिंगसाठी ऑटोमेटेड ॲप्रोच ठेवते. त्यांच्या बेस अकाऊंटिंगबाबतचे शुल्क मासिक पाचशे रुपये असून, त्यात इन्व्हॉइसिंग, बिलिंग, बँक इंटिग्रेशन, जीएसटी फायलिंग आणि इतर सुविधा समाविष्ट असतात. प्रीमियम अकाऊंटसाठीचे मासिक शुल्क आठ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते आणि त्यात अकाऊंटिंगसाठीच्या आणखी वेगवेगळ्या शक्यता उपलब्ध असतात. झोहो बुक्सद्वारे तुमच्या अकाऊंट्सचे व्यवस्थापन करणे अगदी सोपे आणि स्वस्त होत असल्याने विशेषतः छोट्या व्यावसायिकांना झोहो बुक्ससारखे साधन उपयुक्त ठरू शकते.

मार्केट रिसर्च आणि ॲनॅलिसिस Google Web Analytics
तुमच्या ऑनलाइन स्टोअरफ्रंटचा सेटअप पूर्ण झाला, तरी तो कशा प्रकारे काम करतो आहे यावर देखरेख ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते.
गुगल ॲनॅलिटिक्स हे विनामूल्य उपलब्ध होणारे साधन आहे. वेब ट्रॅफिक (तुमच्या वेबसाइटला किती जणांनी भेट दिली ती संख्या, ऑर्डरची संख्या, किती जणांनी वेबसाइटवर खरेदी केली नाही त्यांची संख्या इत्यादी) ट्रॅक करणे आणि त्याबाबत अहवाल तयार करणे शक्य होते. वेबसाइट चालू असतानाच हे टूल आपोआप अपडेट होते आणि वेगवेगळ्या गोष्टी ट्रॅक करत राहते. शिवाय त्यात थर्ड पार्टी टूल्ससारख्या इंटिग्रेशन टूल्सचे वैविध्यही उपलब्ध असते-ज्याचा वापर करून तुम्ही नंतर तुमच्या स्टार्टअप प्रवासाचा मागोवा घेऊ शकता. गुगल ॲनॅलिटिक्सचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे मार्केटिंग कँपेन्सच्या यशापयशाला एक प्रकारचे जोखीम संरक्षण दिले जाते आणि तुमच्या ग्राहकांमध्ये विभागणी करणेही शक्य होते. गुगल ॲनॅलिटिक्स वेगवेगळी टूल्स आणि डेटा उपलब्ध करून देते ज्यांचा वापर करून कोणताही उद्योजक यशाची पायरी चढू शकतो. तर एकूण कोणत्याही ऑनलाइन व्यवसायासाठी ही सहा साधने आवश्यक आहेत. व्यवसाय किंवा उद्योग अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असणाऱ्या उद्योजकाच्या दृष्टीने खर्च किमान ठेवणे महत्त्वाचे असते-त्यामुळे आम्ही कमीत कमी गुंतवणूक करावी लागेल अशा साधनांचा इथे उल्लेख केला आहे. छोट्या व्यवसायांच्या दृष्टीने ही साधने परफेक्ट आहेत. एकदा का तुमच्या उद्योगाची भरभराट व्हायला लागली, की तुम्ही आणखी अपग्रेड करू शकता. 

लेखात उल्लेख केलेली साधने आंतरराष्ट्रीय स्तरावर माहीत आहेत आणि विश्वासार्ह आहेत. याचा अर्थ ती जगभरात कुठूनही वापरणे शक्य असले, तरी त्यांच्यात एकच त्रुटी आहे ती म्हणजे त्यातल्या प्रत्येक गोष्टी भारतीय बाजारपेठेला लागू होतीलच असे नाही. ऑनलाइन स्टोअरफ्रंट्सना मदत करण्यासाठी भारतातल्या कोणत्या कंपनीकडे एकमेवाद्वितीय किंवा नावीन्यपूर्ण सोल्युशन असेल, तर आम्हाला  info@dcfventures.in वर संपर्क साधा. ज्यायोगे आम्ही तुमचे सोल्युशन आणखी व्यापक स्तरावर पोचवायला मदत करू शकू. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com