
आयफोन बिघडण्यापूर्वी बॅटरी लवकर संपणे, अचानक बंद पडणे किंवा गरम होणे हे संकेत दिसतात.
स्क्रीन फ्रीझ होणे, अॅप्स क्रॅश होणे किंवा टच रिस्पॉन्स कमी होणे हे खराबीचे लक्षण आहे.
सॉफ्टवेअर अपडेट्स थांबणे किंवा चार्जिंगला वेळ लागणे हे आयफोनच्या समस्यांचे संकेत आहेत.
iPhone slowing down symptoms: अॅपल आयफोन त्याच्या उत्कृष्ट कामगिरी, प्रीमियम डिझाइन आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बिल्ड क्वालिटीसाठी ओळखला जातो. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाप्रमाणे, आयफोन देखील कालांतराने खराब होऊ शकतो किंवा तांत्रिक समस्या निर्माण करू शकतो. तुमचा आयफोन खराब होण्यापूर्वी तुम्हाला काही 'सिग्नल' देतो परंतु ९०% यूजर्स त्याकडे दुर्लक्ष करतात. जर हे सिग्नल वेळेत ओळखले गेले तर तुम्ही महागड्या दुरुस्ती टाळू शकता.