VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

CYCLONE HORACIO VIRAL VIDEO: भारतीय महासागरात थैमान सुरू आहे. होरासियो चक्रीवादळ बनले २०२६ चे सर्वात शक्तिशाली Category 5 चे वादळ. याचा व्हिडिओ सध्या तेजीने व्हायरल होतोय
INDIAN OCEAN CYCLONE HORACIO VIRAL VIDEO

INDIAN OCEAN CYCLONE HORACIO VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

Cyclone Viral Video : भारतीय महासागरात 'होरासियो'ने थैमान घातले आहे. हे चक्रीवादळ अवघ्या एका दिवसात इतके जबरदस्त झाले की ते २०२६ चे जगातील सर्वात ताकदवान चक्रीवादळ ठरले आहे. २४ फेब्रुवारीला मादागास्करच्या पूर्वेला समुद्रात हे वादळ दिसू लागले. उपग्रहांच्या फोटोंमध्ये फक्त चार सेकंदांत वादळाच्या मध्यभागी गोलाकार, शांत डोळा तयार झाला आहे. हा डोळा म्हणजे वादळाची शांत जागा, पण आजूबाजूला २५७ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे फिरत आहेत. इतक्या जोरदार वाऱ्याने झाडे मूळापासून उचकटून पडतात, खिडक्या फुटतात आणि मोठा नुकसान होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com