Terminalia Tomentosa Tree : हे' झाड आपल्या पोटात कसं साठवतं पाणी? उन्हाळ्यात ठरतं वरदान.. व्हिडिओ होतोय व्हायरल

Crocodile Bark Tree : सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ IFS नरेंद्रन यांच्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट झाला आहे. त्यांनी या झाडाबाबत आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
Terminalia Tomentosa Tree
Terminalia Tomentosa TreeeSakal

Water Tree Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. एक फॉरेस्ट रेंजर एका झाडावर कुऱ्हाडीने वार करतो, आणि लगेच त्या झाडामधून पाण्याचा कारंजा बाहेर पडतो. एखाद्या नळातून बाहेर पडावं तसं पाणी या झाडामधून बाहेर पडू लागतं. अनेकांनी या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र हा व्हिडिओ खरा असून; हे खास झाड भारतात आढळतं.

या झाडाचं नाव टर्मिलिया टोमेनटोसा (Terminalia Tomentosa) असं आहे. या झाडाला क्रोकोडाईल बार्क ट्री (Crocodile Bark Tree) किंवा इंडियन लॉरेल ट्री या नावांनीही ओळखलं जातं. या झाडाचं वैशिष्ट म्हणजे, या झाडाच्या बुंध्यामध्ये कित्येक लीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. ही झाडं सुमारे 30 मीटर उंच वाढतात. साधारणपणे शुष्क आणि दमट जंगलांमध्ये ही झाडं आढळतात.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ IFS नरेंद्रन यांच्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट झाला आहे. त्यांनी या झाडाबाबत आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. आंध्र प्रदेशातील कोंडा रेड्डी समुदायाने याबाबत माहिती दिल्याचं नरेंद्रन यांनी सांगितलं आहे. या झाडाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी याची नेमकी लोकेशन सांगितली नाही.

Terminalia Tomentosa Tree
Viral Video : 'अरे मंगळावरून आलाय काय?' उबर ऑटोचं भाडं ६२ रुपये, बिल साडेसात कोटी; Video होतोय व्हायरल

नरेंद्रन यांनी दि हिंदू या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की "या झाडांमध्ये खरोखरच पाणी साठवण्याची क्षमता आहे की नाही हे आम्हाला पहायचं होतं. आम्ही जेव्हा एका झाडाची साल काढली, तेव्हा त्यातून खरोखरच मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आलं. या पाण्याची चव थोडी आंबट असते, आणि यातून उग्र वास येतो."

या झाडाचं लाकूडही महाग

या झाडाचं लाकूड 'इंडियन सिल्व्हर ओक' म्हणून ओळखलं जातं. हे अतिशय महागडं लाकूड आहे. या झाडाच्या आतमध्ये पाणी असल्यामुळे याचं खोड इतर झाडांच्या तुलनेत फायर-प्रूफ समजलं जातं. यासोबतच या झाडाला धार्मिक महत्त्वही आहे. बौद्ध समाजाचे लोक याला 'बोधिवृक्ष' म्हणून ओळखतात.

Terminalia Tomentosa Tree
Viral Video: आरारारा खतरनाक! कार गरागरा फिरली अन् ड्रायव्हर थेट आकाशात; रोहित शेट्टीचा चित्रपटही ठरेल फेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com