
What's appने तुमच्या खात्यावर निर्बंध लादले असतील तर काय कराल ?
मुंबई : सोशल मीडिया आता प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. सोशल मीडियावर आपण जे काही पाहतोय ते खरे आहे की नाही हेही अनेक वेळा आपल्याला कळत नाही. जाणूनबुजून किंवा नकळत आपण आक्षेपार्ह गोष्टीही शेअर करतो. कधी कधी याचा फटकाही सहन करावा लागतो. आता व्हॉट्सअॅपही अशा यूजर्सवर कडक कारवाई करत आहे.
हेही वाचा: बॅटरी 15,000mAh, किंमत फक्त ८ हजार रुपये; नवीन स्मार्टफोन लॉन्च
व्हॉट्सअॅपने एप्रिल महिन्यातच जवळपास १६ लाख खाती बंद केली होती. अकाऊंट बॅन करण्यामागे व्हॉट्सअॅपने स्पष्टीकरणही दिले होते. यामध्ये कोणाच्या तरी तक्रारीवरून १२२ खात्यांवर बंदी घालण्यात आली होती, तर 16.66 लाख खाती स्वत:हून दखल घेऊन बंद करण्यात आली होती.
कंपनीच्या अटी व शर्ती पूर्ण न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे खाते बंद करण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते. तरीही, व्हॉट्सअॅप अशा वापरकर्त्यांना ओळखत आहे जे घोटाळे करतात, स्पॅम करतात किंवा हानिकारक डेटा शेअर करतात.
खाते निलंबित झाल्यानंतर, वापरकर्त्याच्या मोबाइल स्क्रीनवर एक सूचना दिसेल. तुम्ही व्हॉट्सअॅप ओपन करताच तुम्हाला 'This Account is not permission to use Whatsapp' असा मेसेज येईल.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे खाते चुकून बॅन केले गेले आहे, तर तुम्ही तुमचे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपला देखील देऊ शकता. येथे मेसेज ओपन केल्यानंतर तुम्हाला 'सपोर्ट' दिसेल. त्यावर क्लिक करून, तुम्हाला तुमचे स्पष्टीकरण आणि फाइल पाठवण्याचा पर्याय दिला जातो. येथे तुम्हाला तुमचा नंबर आणि ई-मेल आयडी देखील टाकावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, खाते योग्य असल्याचे आढळल्यास ते पुन्हा उघडले जाईल.
Web Title: What If The Whats App Imposes Restrictions On Your Account
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..