काय आहे GB WhatsApp? तुमच्याकडे असेल तर लगेच करा डिलीट!

WhatsApp
WhatsAppTwitter
Updated on

व्हाट्सअ‍ॅपचा वापर सामान्यत: व्हिडीओ, फोटो आणि ऑडीयो शेअर करण्यासाठी केला जातो. याचा वापर संपूर्ण जगात केला जातो. व्हाट्सअ‍ॅप युझर्सच्या सुविधेसाठी व्हाट्सअ‍ॅप सतत नवनवे व्हर्जन आणते. GB WhatsApp हे एक नवीनच व्हर्जन असून अनेक लोक ते देखील वापरतात. व्हाट्सअ‍ॅपचं एक नवं अपडेट असं सांगत या अ‍ॅपला प्रसारित केलं जात आहे. मात्र, हे अ‍ॅप साधंसुधं नसून खतरनाक आहे. जर तुम्हीही हे GB WhatsApp डाऊनलोड केलं असेल तर ते तातडीने डिलीट करुन टाका. हे व्हाट्सअ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनमधील माहिती आणि डेटा चोरी करु शकतं.

WhatsApp
'E-PAN Card' हवयं? अप्लाय केल्यानंतर ताबडतोब करा डाउनलोड

GB WhatsApp हे काही व्हाट्सअ‍ॅपचं नवं व्हर्जन नाहीये. ते पूर्णत: वेगळं अ‍ॅप आहे. जेंव्हा केंव्हा आपण एखाद्या मॅसेजिंग अ‍ॅपचा विचार करतो तेंव्हा आपल्या डोक्यात सर्वांत आधी येतं ते व्हाट्सअ‍ॅप! जर आपल्याला काही अतिरिक्त फिचर्स सहित व्हाट्सऍपचा वापर करायचा असेल तर तुम्हाला हे GB WhatsApp तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावं लागतं. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीये. हे डाऊनलोड करण्यासाठी याची एपीके फाईल डोऊनलोड करावी लागते जी पूर्णपणे सुरक्षित नाहीये.

GB WhatsApp पासून काय धोका आहे?

GB WhatsApp वापरायला सुरु करताच तुमचं ओरिजीनल व्हाट्सऍप ब्लॉक होऊ शकतं. जर तुम्ही तुमचं ओरिजीनल व्हाट्सऍप डिलीट करु इच्छित नसाल तर तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड करु नका आणि जर डाऊनलोड केलं असेल तर ते त्वरित डिलीट करा. कारण हे अ‍ॅप तुमच्या मोबाईलमधील सगळा डेटा चोरी करु शकतं.

WhatsApp
स्मार्ट TV ला मोबाईलसोबत कसं कराल कनेक्ट? वापरा या Tips

काय आहे GB WhatsApp?

GB WhatsApp हे व्हाट्सऍपचं क्लोन अ‍ॅप आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं तर जीबी व्हाट्सऍप तिसऱ्या बाजूच्या डेव्हलपर्सना व्हाट्ससारखंच एक मॅसेजिंग अ‍ॅप बनवण्याची परवानगी देतं. यामध्ये तंतोतंत व्हाट्सअ‍ॅपप्रमाणेच मॅसेजिंग, व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंग करता येते. व्हाट्सअ‍ॅपच्या या क्लोन अ‍ॅपला युझर्स आपल्या सुविधेनुसार कस्टमाईज करु शकतात. सोबतच या जीबी व्हाट्सअ‍ॅपवर काही एक्स्ट्रा फीचर्स देखील मिळतात. यामुळे युझर्सना व्हाट्सअ‍ॅपचा वापर करणं अगदी सोपं जातं. मात्र, जीबी व्हाट्सअ‍ॅपचा वापर करणं धोकादायक सिद्ध होऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com