Sugar Daddy App काय आहे? Google ने केलेय बॅन, जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Daddy App काय आहे? Google ने केलेय बॅन, जाणून घ्या डिटेल्स

Google ने जाहीर केले आहे की, 1 सप्टेंबरपासून Sugar Daddy Apps वर बंदी घातली जाईल. जे चुकीच्या कामात सहभागी झाले आहेत. तेव्हापासून Sugar Daddy Apps बद्दल बरीच चर्चा सुरु आहे. अशावेळी, जाणून घ्या की Sugar Daddy App काय आहे?

Sugar Daddy App काय आहे? Google ने केलेय बॅन, जाणून घ्या डिटेल्स

पुणे: Google ने आपल्या Google Play Storeचे नियम बदलले आहेत, जे 1 सप्टेंबरपासून जगभरात लागू आहेत. एकदा नवीन बदल प्रभावी झाल्यानंतर अनेक अ‍ॅप्स Google Play Store वरून काढले जातील. Google ने जाहीर केले आहे की, 1 सप्टेंबरपासून Sugar Daddy Apps वर बंदी घातली जाईल, जे चुकीच्या कामात गुंतले आहेत. तेव्हापासून Sugar Daddy Apps बद्दल बरीच चर्चा झाली. अशा परिस्थितीत, Sugar Daddy Apps काय आहे? आणि Google ने या अ‍ॅपवर बंदी का घातली आहे. ते जाणून घेऊयात.

हेही वाचा: Paytm, Zomato, Disney+ HotStar सह अनेक अ‍ॅप्स डाऊन; युजर्स वैतागले!

काय आहे Sugar Daddy Apps...

Sugar Daddy Apps ही एक कॅटेगरी आहे जी शुगर डेटिंगला प्रोत्साहन देते. सोप्या भाषेत सांगायचे तर, Sugar Daddy Apps ने सुरुवातीला वृद्ध लोकांना लहान वयात कनेक्ट होण्यास मदत केली. परंतु आता असा आरोप केला जात आहे की, हे चुकीचे रिलेशनशिप प्रस्थापित करण्यासाठी केले जात आहे, जेथे अ‍ॅप्समधील वृद्ध लोक कॅश आणि गिफ्टच्या बदल्यात लहान मुलींशी रिलेशनशिपला एक्सचेंज करताहेत. प्रॉस्टिट्यूशनपेक्षा हे थोडे वेगळे आहे. अशी अनेक अ‍ॅप्स गुगलवर ओळखली गेली आहेत, जी हजारो संख्यामध्ये डाऊनलोड केली गेली आहेत.

हेही वाचा: हे 10 अ‍ॅप्स चोरतात फेसबुकचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड

Google लागू करत आहे नवीन पॉलिसी...

Google द्वारे दोन प्रकारची पॉलिसी राबवली जात आहेत. यापैकी चुकीच्या कंटेटला प्रमोट करणाऱ्या अ‍ॅप्सवर 1 सप्टेंबरपासून बंदी घातली जात आहे. याच फ्रॉड फायनांन्सशियल सर्विसमध्ये समाविष्ट असलेल्या अ‍ॅपवर 15 सप्टेंबरपासून गुगल प्ले स्टोअरवर बंदी घालण्यात येणार आहे, ज्यामुळे पर्सनल लोनच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल. पर्सनल लोन कर्जदार आणि कर्जदाराकडून गुगल शक्य तितकी माहिती गोळा करेल. Goolge भारत आणि इंडोनेशियासाठी पर्सनल लोन अ‍ॅपचे नियम लागू करत आहे. याआधीही Apple कडून असेच काही नियम लागू करण्यात आले आहेत.

Web Title: What Is Sugar Daddy App Which Banned On Google Play Store From 1 September 2021

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technologybanned