

FUTURE HYPERSONIC AIRPLANES SUSTAINABLE AVIATION GREEN HYDROGEN SAF SMART CABIN TECHNOLOGY 2026
esakal
जेव्हा हे एआय विमान धावपट्टीवरून धावू लागेल, तेव्हा कॉकपिटमध्ये कोणताही मानवी आवाज नसेल. एका अदृश्य, अत्यंत तीक्ष्ण आणि कधीही न थकणाऱ्या 'डिजिटल मेंदू'च्या हाती विमानाचा कंट्रोल असेल.
प्रवाशांना सुरुवातीला विमानाचा मुख्य चालक माणूस नाही या विचाराने धाकधूक वाटेल पण विमान हवेत झेपावताच एक अद्भूत शांतता आणि सुरक्षिततेचा अनुभव येईल. हा प्रवास मानवी चुकांच्या पलीकडचा असेल.