व्हॉटसऍप देणार चूक सुधारण्याची संधी

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

"व्हॉटसऍप' या लोकप्रिय मेसेंजर ऍपवर एखादा "सेंड' झालेला संदेश मागे घेण्याची सुविधा (रिव्होक) येणार आहे. याशिवाय अन्य काही नव्या सुविधाही लवरकच उपलब्ध होणार आहेत.

नवी दिल्ली - "व्हॉटसऍप' या लोकप्रिय मेसेंजर ऍपवर एखादा "सेंड' झालेला संदेश मागे घेण्याची सुविधा (रिव्होक) येणार आहे. याशिवाय अन्य काही नव्या सुविधाही लवरकच उपलब्ध होणार आहेत.

जलद आणि वेगवान संदेश देवाणघेवाण करण्यासाठी सध्या भारतासह जगातील अनेक देशात व्हॉटसऍप लोकप्रिय आहे. मात्र, एखादवेळी अनावधनाने नको त्या व्यक्तीला किंवा समूहाला नको तो मेसेज सेंड होतो. अशा वेळी तो संदेश मागे घेता येत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी व्हॉटसऍप प्रयत्नशील आहे. "व्हॉटसऍप'च्या अपडेटसबद्दल माहिती देणाऱ्या ट्विटरवरील @WABetaInfo या पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. व्हॉटसऍपच्या 0.2.4077 या वेब व्हर्जनवर 'रिव्होक'ची सुविधा देण्यात आल्याचा दावाही @WABetaInfo ने केला आहे. तर लवकरच मेसेजमधील टेक्‍स्टला बोल्ड, इटॅलिक वगैरे सारखे फॉरमॅटिंग करण्यासाठी शॉर्टकटस्‌ही देण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. ही सुविधा व्हॉटसऍपच्या बीटा व्हर्जनवर सुरु करण्यात आली असल्याची माहितीही दिली आहे.

कशी असेल 'रिव्होक'ची सुविधा?
एखादा मेसेज सेंड झाल्यानंतर सेंड झाल्यापासून पुढील पाच मिनिटे तुम्हाला तो मेसेज मागे घेण्यासाठी सुविधा देण्यात येईल. मात्र, एकदा हे पाच मिनिटे झाले तर पुन्हा तुम्हाला तो संदेश अनसेंड करता येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp: ‘Unsend’ message feature and new shortcuts arrive in beta