फोन व नंबर बदलल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप होणार नाही डिलीट, जाणून घ्या

WhatsApp
WhatsAppGoogle
Summary

WhatsApp यूजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फीचरवर काम करत आहे. या फीटरच्या रोलआउटनंतर, वापरकर्ते त्यांच्या चॅट हिस्ट्री शिफ्ट करु शकतील.

WhatsApp यूजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फीचरवर काम करत आहे. या फीटरच्या रोलआउटनंतर, वापरकर्ते त्यांच्या चॅट हिस्ट्री शिफ्ट करु शकतील. तसेच, आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते एका मोबाईल नंबरवरून दुसर्‍या मोबाईल नंबरवर बदलू शकतील. तसेच, वापरकर्ते त्यांच्या अकाऊंट चॅट हिस्ट्री अँड्रॉइड वरून आयओएस प्लॅटफॉर्मवर बदलू शकतील. (whatsapp account will not be deleted when you change your smartphone and mobile)

या फीचर्समुळे वापरकर्त्यांना Android वरून iOS किंवा iOS वरुन Android स्मार्टफोनमध्ये हलविणे सोपे होईल. तसेच वेगवेगळ्या मोबाइल नंबरवर एकच खाते चालविण्याची सुविधा देखील असेल. याद्वारे, वापरकर्ते त्यांचा मोबाइल नंबर बदलू शकतील. आतापर्यंत आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते ज्या क्रमांकावर रजिस्टर आहे, त्यातून व्हॉट्सअॅप चालवण्याची सुविधा होती. यामुळे बर्‍याच प्रसंगी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचा मोबाईल नंबर अ‍ॅक्टिव्ह असणे आवश्यक होते.

WhatsApp
आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर

नवीन फीचर्स कसे काम करतील

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरवर काम सुरू आहे. Wabetainfo च्या अहवालानुसार, नवीन फीचरच्या रोलआऊटनंतर वापरकर्त्याला व्हॉट्सअॅपच्या सेटिंग मेनूमध्ये चॅट हिस्ट्री मायग्रेट करण्याचा पर्याय असेल. यासाठी वापरकर्त्याने पहिल्यांदा प्ले स्टोअर वरून आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते अपडेट केले पाहिजे. त्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. चॅट हिस्ट्री एकाच टॅपसह मायग्रेट केली जाऊ शकते. यासाठी, आपल्याला फक्त स्टार्ट बटणावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर चॅट हिस्ट्री हटविण्याचा पर्याय आपोआप सुरू होईल. नवीन अपडेटनंतर, केवळ चॅटच नाही तर मीडिया फायली देखील मायग्रेट होतील. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मल्टी-डिव्हाइस फीचर तयार केले जात आहे, जे आपल्याला वेगवेगळ्या डिव्हाइसवर समान खाते चालविण्याची परवानगी देते. (whatsapp account will not be deleted when you change your smartphone and mobile)

WhatsApp
Google Maps पुढील काळात आणणार 'हे; महत्वाचे फीचर्स; जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com