आता व्हॉटस्अॅप स्टेटस ठेवा व्हिडिओ

whatsapp
whatsapp

नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉटस्अॅपने आजपासून (शुक्रवार) नवीन सुविधा वापरकर्त्यांसाठी दिली आहे. व्हॉट्सऍप वापरकर्ते स्टेटसवर मजकुराच्या ठिकाणी व्हिडिओ किंवा जीआयएफ फाईल्स देखील अपलोड करू शकणार आहेत.

व्हॉटस्अॅपने नेटिझन्सची गरज ओळखून सातत्याने बदल सुरू ठेवले आहेत. व्हॉटस्अॅपने यापुर्वी पीडीएफ, व्हिडिओ, जीआयएफ फाईल अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नेटिझन्सनी या बदलांचे स्वागत केले आहे.

व्हॉटस्अॅपने स्टेटसवर व्हिडिओ अपलोडींग करण्याची सुविधा देऊन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नव्या अपडेटमध्ये ही सुविधा आहे. यामध्ये स्टेटससाठी वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. व्हॉटस्अॅपच्या मुख्य स्क्रिनवर दोन मुख्य बदल केले आहेत. सर्वात पहिल्या टॅबवर क्लिक केल्यास वापरकर्त्यांना थेट कॅमेरा उघडता येणार आहे. स्टेटस या नव्या टॅबवर क्लिक केल्यास My Status दिसेल. तिथे क्लिक केल्यास पुन्हा कॅमेरा उघडला जाईल, ज्या द्वारे व्हिडिओ अथवा फोटो अपलोड करता येणार आहेत. परंतु, स्टेटसवर व्हिडिओ 24 तासच राहणार आहेत. त्यानंतर तो आपोआप जाणार आहे. सध्या हे फिचर बिटा व्हर्जन आहे.

व्हॉटस्अॅपचे सध्या 1.2 अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत. हे वापरकर्ते महिन्यात किमान एकदा तरी व्हॉटस्अॅप वापरताच. जगभरात रोज व्हॉटस्अॅपद्वारे 50 अब्ज संदेशांची देवाणघेवाण होते. दररोज 3.3 अब्ज फोटो आणि 8 कोटी जीआयएफची व्हॉटस्अॅपवर देवाणघेवाण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com