‘व्हॉट्‌सॲप ॲडमिन’ला वाढीव अधिकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मुंबई - ‘व्हॉट्‌सॲप मॅसेंजर’ने आता ग्रुप ॲडमीनला संपूर्ण नियंत्रणाची सुविधा देणारे ‘सेंड मेसेज’ हे फीचर देण्यास सुरवात केली असून, यामुळे ॲडमिन अधिक सशक्त होऊन तो आता कोणत्याही व्हॉट्‌सॲप ग्रुपला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये परिवर्तित करू शकणार आहे.

मुंबई - ‘व्हॉट्‌सॲप मॅसेंजर’ने आता ग्रुप ॲडमीनला संपूर्ण नियंत्रणाची सुविधा देणारे ‘सेंड मेसेज’ हे फीचर देण्यास सुरवात केली असून, यामुळे ॲडमिन अधिक सशक्त होऊन तो आता कोणत्याही व्हॉट्‌सॲप ग्रुपला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये परिवर्तित करू शकणार आहे.

अलीकडे बरेच ग्रुप मेंबर हे त्रासदायक मेसेज पाठवत असतात. ग्रुपमधील अशा सदस्यांना रिमूव्ह करणे शक्‍य असते, मात्र अनेकदा तसे करणे जिकिरीचे असते. अशा सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी ‘रेस्ट्रिक्‍ट ग्रुप’ हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. या नव्या फिचरमुळे कोणत्याही सदस्याला संबंधित ग्रुपमध्ये मेसेज टाकण्यापासून रोखणे ॲडमीनला शक्‍य होणार आहे. अर्थात ‘सेंड मॅसेज’ या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्‌सॲप ग्रुपवरील संवाद हा ‘वन वे’ होण्याचा धोका आहे. कारण यामध्ये फक्त ग्रुपचा ॲडमीनच पोस्ट टाकू शकणार आहे. ‘ऑल पार्टीसिपेंट’ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यातील पहिल्यावर क्‍लिक केल्यास फक्त ग्रुप ॲडमीन पोस्ट करू शकणार आहेत. तर, दुसऱ्याची निवड केल्यास ग्रुपमधील अन्य सदस्यदेखील पोस्ट करू शकतील. अर्थात, कोणत्याही ग्रुप मेंबरला पोस्ट करण्यापासून रोखू शकण्याचा पर्याय यात ॲडमीनला देण्यात आलेला आहे.

व्हॉट्‌सॲप मॅसेंजरचे हे फिचर अँड्रॉईड, आयओएस आणि वेब या तिन्ही प्रणालींसाठी प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हे फीचर ‘आयओएस’ यूजर्ससाठी लागू करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp admin rights

टॅग्स