

WhatsApp users viewing sponsored ads appearing between regular Status updates and in followed Channels within the Updates tab.
esakal
Whatsapp Ads Feature : जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अखेर जाहिरातींचा मार्ग अवलंबला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतासह अनेक देशांतील युजर्सना अपडेट्स टॅबमध्ये स्टेटस आणि फॉलो केलेल्या चॅनेल्स दरम्यान प्रोमोशनल पोस्ट्स दिसू लागल्या आहेत. मेटाच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने वर्षानुवर्षे जाहिरातींपासून दूर राहून युजर्सचे मन जिंकले होते, पण आता मोठ्या बदलाची सुरुवात झाली आहे.