व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम होणार लिंक

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

तुम्ही व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम दोन्हीही वापरत असाल, तर लवकरच तुमच्यासाठी एक नवे फीचर येणार आहे. कंपनी सध्या एका अशा फीचरची चाचणी करत असून, या फीचरमुळे इंस्टाग्राम युझर्सच्या इंस्टा स्टोरीज व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून शेअर करता येणार आहे.

अशाप्रकारे स्टोरी पोस्ट करण्यासाठी युझर्सना व्हॉट्सअॅपमध्ये जाऊन 'सेंड' ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. इंस्टाग्राम स्टोरीज आणि व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासांसाठी लाईव्ह असते. ही स्टोरी डिलीटही करता येणेही युझर्सना शक्य होणार आहे. ज्या युझर्सना दोन्हीकडेही स्टेटस अपडेट करायचे आहे, त्यांचा या फीचरमुळे वेळ वाचणार आहे.

या फीचरची सध्या केवळ चाचणी सुरु असून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या इंस्टा स्टोरी थेट फेसबुकला शेअर करता येतात. त्यामुळे फेसबुकच्याच मालकीच्या असलेल्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपमध्येही आता हे फीचर मिळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp and Instagram could be getting a new feature