व्हॉट्सअॅप काही तास बंद पडल्याने गोंधळ; पुन्हा पूर्ववत

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

येथे मध्यरात्रीची वेळ असल्याने भारतीय युजर्सला ही अडचण फारशी जाणवली नाही. परंतु, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणारे भारतीय युजर्स गोंधळून गेले. पाश्चात्य देशांमध्येही व्हॉट्सअॅप बंद पडले, मात्र त्यावेळी तिथे दिवस असल्याने वापरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने 'ऑनलाईन गोंधळ' अधिक उडाला.

मुंबई : जगातील आघाडीचे मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप रात्री अचानक बंद झाल्याने नेटिझन्सचा गोंधळ उडाला. व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय अॅप्लिकेशन अनेकांचे व्यसन बनले आहे. त्यामुळे ते बंद पडल्याबद्दल जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास व्हॉट्सअॅप पूर्ववत सुरू झाले. 

भारत, कॅनडा, अमेरिका आणि ब्राझीलमध्ये व्हॉट्सॅप बंद पडले होते. इंटरनेटची सेवा विस्कळीत झाल्याने अथवा आपला मोबाइल बिघडल्याने व्हॉट्सअॅप चालत नाही, असे अनेक युजर्सना प्रथम वाटले. त्यामुळे जगभरातील व्हॉटसअॅप युजर्स गोंधळून गेले. रात्री 2 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्स अॅपवर मेसेज येणे बंद झाले. 

येथे मध्यरात्रीची वेळ असल्याने भारतीय युजर्सला ही अडचण फारशी जाणवली नाही. परंतु, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणारे भारतीय युजर्स गोंधळून गेले. पाश्चात्य देशांमध्येही व्हॉट्सअॅप बंद पडले, मात्र त्यावेळी तिथे दिवस असल्याने वापरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने 'ऑनलाईन गोंधळ' उडाला. आपले व्हॉट्सअॅपचे हॅकिंग झाले आहे काय अशा शंका अनेकांना आल्याने या गोंधळात भर पडली. 

'ही समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही देशांमध्ये व्हॉटअॅप सुरू करण्यात अद्याप अडचणी येत आहेत. मात्र यामुळे झालेल्या त्रासाबद्दल व्हॉट्सअॅप व्यवस्थापन दिलगीर आहे,' असे व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी सांगतिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp back online after global outage of ‘a few hours’