WhatsApp ने आणलं नवं फिचर; वाचा कोणतं आहे ते...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा होतोय मोठ्या प्रमाणात वापर. 

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपल्या युजर्ससाठी कंपनीकडून नवनवे अपडेटेड फिचर्स देण्यात येत आहेत. त्यानंतर आता WhatsApp ने नवा अपडेट आणला आहे. मात्र, हे नवे अपडेट जुन्या बिटा युजर्ससाठी उपलब्ध आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

त्यानंतर आता येत्या काही दिवसांत WhatsApp कडून नवे अपडेट इतर युजर्ससाठीही आणले जाणार आहेत. या नव्या फिचर्ससाठी एका मोठ्या बगला फिक्स करण्यात आले आहे. त्यामुळे आता युजर्सना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे जर व्हॉट्सपमुळे तुमचा फोन बंद होत असेल तर लगेचच अपडेट करावा.

गुंता सुटला, आता शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक

WABetaInfo ने WhatsApp च्या कॅमेरात बदल केले आहेत. त्यांनी कॅमेरासाठी नवीन आयकॉन आणले आहे. या नव्या आयकॉनमुळे फोटो काढताना फोन बंद होणार आहे. त्याचबरोबर व्यूफाइंडरचाही यात समावेश करण्यात आला आहे. 

नवा कॅमेरा दिसणार स्टेट्स टॅबमध्ये

WhatsApp चा नवा कॅमेरा आयकॉन स्टेट्स टॅबमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर चॅटबारमध्ये असलेल्या कॅमेरा आयकॉनमध्येही बदल करण्यात आला आहे. 

इन्स्टाग्रामचे Likes झाले गायब

इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकल्यास त्याला इतर युजर्सकडून Likes मिळत होते. मात्र, आता इन्स्टाग्रामने हा ऑप्शनच काढून टाकला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp beta update for iOS brings redesigned