
Whatsapp Changes : सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणजे Whatsapp. अगदी विद्यार्थ्यांपासून ते ऑफिस, गृहिणी... शक्य असेल त्या ठिकाणी Whatsapp चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
पण Whatsapp मध्ये मागील काही दिवसांपासून रोज नवनवीन बदल होताना दिसत आहेत. आता देखील अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये एक मोठा बदल होणार असून आयओएस अर्थात आयफोनप्रमाणे अँड्रॉईड फोन्सचं Whatsapp यापुढे दिसणार आहे.
सध्या आयफोनमध्ये Whatsapp ओपन केल्यावर चॅट, स्टेटस, सेटिंग्ज या साऱ्या टॅब्स खालच्या बाजूला दिसतात. त्याचप्रमाणे आता अँड्रॉईडमध्येही आता या साऱ्या टॅब्स ज्या वरच्या बाजूला दिसतात त्या खालीच दिसणार आहेत. मेटाने Whatsappची ओनरशिप घेतल्यानंतर नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स Whatsapp मध्ये येत आहेत.
दरम्यान Whatsapp च्या नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार Whatsapp चं यूजर्स इंटरफेस (UI) पुढील काही अपडेट्सनतंर पूर्णपणे बदलणार आहे.
कंपनीने केलेल्या क्लीन UI टेस्टिंगनंतर आता अँड्रॉईडमध्येही IOS म्हणजेच आयफोनप्रमाणे इंटरफेस दिला जाणार आहे. त्यामुळे आता अँड्रॉईड वापरकर्त्यांना देखील आयफोनप्रमाणे सर्व टॅब्स या खालच्या बाजूला दिसणार आहेत. त्यामुळेअँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी Whatsapp चा चेहरा-मोहरा बदलणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.