WhatsApp Desktop App | आता फोनशिवाय देखील डेस्कटॉपवर चालेल व्हॉट्सॲप; वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp

आता फोनशिवाय देखील डेस्कटॉपवर चालेल व्हॉट्सॲप

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

WhatsApp Desktop App : Meta च्या मालकीचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp कडून MacOS आणि Windows वापरकर्त्यांसाठी एक नवीन ॲप लॉंच केले जात आहे. व्हॉट्सॲप फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप एका नवीन ॲपवर काम करत आहे. रिपोर्टनुसार, हे युनिव्हर्सल विंडो प्लॅटफॉर्मवर आधारित ॲप असेल. WhatsApp बऱ्याच काळापासून विंडोजवर चालणाऱ्या डेस्कटॉप ॲपवर काम करत आहे, ज्याचे बीटा व्हर्जन लॉन्च केले गेले आहे, जे मायक्रोसॉफ्ट विंडोज ॲप स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

दरम्यान WhatsApp चे हे बिटा व्हर्जन सर्व वापकर्त्यांना वापरता येणार नाही, तसेच हे वापरताना काही अडचणी देखील येऊ शकतात. कंपनी लवकरच याचे स्टेबल व्हर्जन लॉंच करेल.

हेही वाचा: Truecaller मध्ये करा कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

काय फायदा होईल

WhatsApp डेस्कटॉप ॲप बंद केल्यानंतरही नोटिफिकेशन फीचर काम करत राहील. म्हणजे आता डेस्कटॉपवर WhatsApp चालवण्यासाठी फोनची गरज भासणार नाही. वापरकर्ते डेस्कटॉपवरच व्हॉट्सॲपवर लॉग-आउट आणि लॉग-इन करू शकतील. हे पूर्णपणे नवीन ॲप असेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना WhatsApp वेब उघडण्यासाठी Google Chrome, Microsoft Edge सारख्या ब्राउझरची गरज भासणार नाही. नवीन ॲप चालविण्यासाठी Windows सिस्टममध्ये x64 आर्किटेक्चर-आधारित CPU आणि Windows 10 आवृत्ती 14316.0 किंवा त्यापेक्षा पुढची आवृत्ती असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

व्हॉट्सॲपचे डेस्कटॉप ॲप कसे डाउनलोड करावे

सर्वप्रथम Microsoft Windows च्या स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करा.

नंतर तेथे स्टोअर पर्याय शोधा. यानंतर तेथे Microsoft Windows Store App येईल.

जिथे तुम्हाला WhatsApp Desktop शोधावे लागेल.

त्यानंतर डाउनलोड करण्यासाठी गेट बटणावर क्लिक करा.

loading image
go to top