Whatsapp, Facebook, Instagram बाबत घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय

fb insta whatsapp
fb insta whatsapp

नवी दिल्ली - फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप वापरणं म्हणजेच सोशल मीडिया असं काहीसं समीकरण तयार झालं आहे. त्यातही आता व्हॉटसअॅप स्टेटस थेट फेसबुक स्टोरी म्हणूनही शेअर करता येतात. ही तिनही अॅप एकमेकांशी कनेक्ट आहेत. इन्स्टा आणि व्हॉटसअॅप फेसबुकनेच खरेदी केलं असल्यानं आता व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकबाबत आता मोठा निर्णय़ घेतला शक्यता आहे. तिन्ही प्लॅटफॉर्मच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या होत आहे.

फेसबुकने याआधीच व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम विकत घेतलं आहे. या मोठ्या दोन प्लॅटफॉर्मच्या खरेदीनंतर असा अंदाज लावला जात आहे की तीनही प्लॅटफॉर्म एकत्र काम करण्यासाठी विलीनीकरण केलं जाईल. गेल्या वर्षी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं स्पष्ट केलं होतं की, भविष्यात चांगली सेवा देण्यासाठी तिन्ही प्लॅटफॉर्म एकत्र करण्याचा प्लॅन आहे. 

फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर एकत्र करण्याची तयारी सध्या सुरु आहे. म्हणजेच या प्लॅटफॉर्मवर व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्रामचे युजर्स एकमेकांशी संवाद साधू शकतील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होणारा वापर पाहिला तर असं म्हणता येईल की, फेसबुकचा हा थ्री इन वन प्लॅटफॉर्मचा निर्णय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. 

WABetaInfo च्या एका रिपोर्टमध्ये या फिचरकडे इशारा करण्यात आला आहे. फेसबुक मेसेंजरचा वापर करून तीनही प्लॅटफॉर्ममध्ये एक कनेक्शन तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहे. फेसबुक एक लोकल डेटाबेसमध्ये टेबल तयार करत आहे. जे व्हॉटसअ‍ॅप युजरचे मेसेज आणि सेवा सुरळीत करण्यासाठी सहायक होतील. याचा वापर करून फेसबुक कॉन्टॅक्ट नंबर आणि मेसेज एकत्र करू शकेल.

सध्या फेसबुकची ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. यामुळे आताच याबाबत काही सांगणे कठीण असेल. फेसबुक त्यांच्या युजरला इतर प्लॅटफॉर्मसोबत संवाद साधण्याची सेवा कधी देईल हे सांगता येणार नाही. भविष्यात या योजनेला प्रत्यक्षात आणण्याचा किंवा न आणण्याचा सर्वस्वी निर्णय अर्थात फेसबुकचा असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com